-
Vigeland park
घरातून निघतानाच नेमका पाऊस जोरात आल्यामुळे नक्की बाहेर जायचे का नाही अशी द्विधा मनस्थिती झाली खरी, पण तरी सुद्धा निश्चयाने Vigeland Park मध्ये जाण्यासाठी ट्राम मध्ये बसलेच. जोरात पाऊस आल्यामुळे रस्त्यावर लोकांची पळापळ चालू होती. काहीजण आपापले सामान सांभाळत आडोसा शोधताना दिसत होते. आमची ट्राम जेव्हा पार्क जवळ आली तेव्हा जवळ जवळ पाऊस थांबलाच होता…