-

Preikestolen
Norway मध्ये येऊन निसर्गाचा हाच तर एक महत्वाचा नियम मी शिकण्याचा प्रयत्न करत आहे. की निसर्गाशी आपल्याला जुळवून घेता आले पाहिजे. एकदा का तुम्हाला ते गणित जमले की तुमच्यासारखे सुखी तुम्हीच!!! असो, तर या वेळेस तिथे जाण्याचे एक महत्वाचे कारण होते ते म्हणजे, “Preikestolen”!!!
-

मनापासून…मनापर्यंत…
“निसर्ग” हा एक असा चमत्कार आहे, की जो अनुभवताना आणि बघताना कायमच हरखून जायला होते व आपण त्याच्यापुढे किती लहान आहोत याची सतत जाणीव होते. कॅमेऱ्याच्या कुपीत कैद केलेले असे कित्येक क्षण नंतर बघताना, त्यावेळेस पाहिलेल्या ठिकाणच्या सर्व आठवणी मनात ताज्या होतात. जगातील अनेक सुंदर ठिकाणांपैकी आपणही काही ठिकाणी बघितली आहेत या विचाराने होणारा आनंद…
-

Loppe market…
खरेदी हा तसा खूप जणांचा अगदी आवडीचा विषय. विशेष करून काही महिलांसाठी तर हा अगदी जिव्हाळ्याचाच विषय म्हणावा लागेल. वयोगट कोणताही असो पण एखादी हवीहवीशी गोष्ट मनासारखी मिळाली तर आनंद हा प्रत्येकाला होतोच आणि जर काही आवडीच्या, जुन्या-नव्या अश्या नानाविध वस्तूंचा खजिना जर एकाच ठिकाणी सापडला तर काय सोन्याहून पिवळे नाही का? नॉर्वेमध्ये राहून अशाच…
-

Dubrovnik आणि Game of Thrones…
Croatia ट्रीप होऊन आता अर्धे वर्ष होऊन देखील गेले तरीसुद्धा त्या बद्दल म्हणावे तितके पुरेसे लिहिले गेले नव्हते. त्या ट्रीप मधील पहिला लेख लिहिला तो Plitvice बद्दल. अत्यंत सुंदर अशी ती जागा बघून अक्षरशः स्वर्गसुख अनुभवल्याचा आनंद मिळाला. (त्याची लिंक हा लेख संपल्यावर देते.) त्यानंतर बघितलेल्या सर्व जागा देखील छानच होत्या. त्यातीलच अजून एक ठिकाण…
-

मुक्काम पोस्ट Bogstadveien…
“प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी असे एक वळण येते की ते स्वीकारून तुम्ही पुढे गेलात तर तुमचे आयुष्य जास्त सुखकर आणि सोप्पे होते” असे मी ऐकले होते. पण शाब्दिकरित्या देखील हे तंतोतंत खरे ठरेल हे कधी वाटले नव्हते. पण गेले काही महिने, महिनेच काय पण जवळजवळ दीड वर्षे मी असा अनुभव घेत आहे.
-

Alpine यात्रा
आज ज्या देशाचे वर्णन करत आहे तो देश बघण्याची माझी दुसरी वेळ! मी जेव्हा पहिल्यांदा हा देश बघितला तेव्हा या देशाचे वर्णन करताना लिहले होते की “त्यावेळी तिथून निघताना मनामध्ये एक हुरहूर होती. कारण 3-4 दिवस फिरून देखील समाधान काही झाले नव्हते.” त्यामुळेच मनामध्ये एक इच्छा होती की परत एकदा तरी संधी मिळावी आणि परत…
-

मंत्रमुग्ध करणारे संगीत…
सूर्यास्ताच्या वेळी हळूहळू अंधार होत असताना, पक्षी घरट्याकडे परत जात असताना पॅलेसचा संपूर्ण परिसर संगीतमय झाला होता. एक वेगळाच “माहोल” काल अनुभवायला मिळाला.
-

सफर Lofoten ची…
डोंगरांमधून वाहत असलेले धबधबे, पांढरे गुळगुळीत दगड, काही दगडांवर उगवलेल्या वनस्पती, झाडे हे सर्वच म्हणजे डोळ्यांसाठी एक सोहळाच जणू! मला इथली अजून एक गंमत वाटते ती म्हणजे, एकीकडे बघितले तर जाता जाता वाटेतील दिसणारा एक साधा दगड देखील लक्षवेधी ठरवा, तर दुसरीकडे अथांग, अमर्यादित पसरलेल्या डोंगरांमुळे असे कित्येक क्षण आनंददायी ठरावेत.
-

Northern lights-एक जादुई अनुभव…
एकदा का या सगळ्या गोष्टी व नशीब अशी एकत्र भट्टी जमून आली आणि प्रत्यक्ष डोळ्यांना Northern lights दिसले तर त्यावेळेस होणारा आनंद हा शब्दात सांगणे हे मात्र कठीणच जाते. कितीही वेळा बघितले तरी प्रत्येक वेळी बघताना होणारा आनंद हा काही वेगळाच असतो व अशी वेळ परत परत यावी आणि परत परत बघता यावे अशी इच्छा…

