मनापासून…मनापर्यंत…

उद्या 17 मे म्हणजे नॉर्वेचा “संविधान दिवस”. या देशासाठी आणि इथल्या नागरिकांसाठी हा अभिमानाचा व महत्त्वाचा दिवस आहेच पण माझ्यासाठी देखील हा दिवस एका खास कारणासाठी महत्त्वाचा आहे. ते कारण म्हणजे, 3 वर्षांपूर्वी याच दिवशी माझा लेखन प्रवास सुरू झाला. ज्या देशामुळे माझीच मला नव्याने ओळख झाली त्याच देशाबद्दल लिखाण करताना “17 मे” हाच योग्य दिवस असू शकतो नाही का? याच विचाराने सुरू केला होता “आठवणींचा खजिना”!!!  

नॉर्वेपासून हळू हळू सुरूवात करत अनेक देशांची या खजिन्यात भर पडली. अनेक नवीन नवीन गोष्टी, ठिकाणे, अनुभव गोळा करत आपला खजिना हा खऱ्या अर्थी श्रीमंत होत गेला. मराठी लोकांशिवाय अनेक अमराठी आणि काही नॉर्वेजियन लोकांनी देखील काही लेख भाषांतरित करून वाचले तेव्हा एका गोष्टीची जाणीव मला झाली की, भावनेला भाषेशी मर्यादा नसते, भावना शुद्ध आणि सकारात्मक असेल तर वाचकांच्या देखील मनापर्यंत पोहचते. अर्थात याचे संपूर्ण श्रेय सर्व वाचकांना आणि माझ्या घरच्यांना जाते कारण त्यांच्या प्रोत्साहनाशिवाय हे शक्य नव्हते. त्यासाठी त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानते.  

असे म्हणतात जिथून सुरुवात केली त्याचा कधीच विसर पडू नये. म्हणूनच आज या खास दिवशी नॉर्वे मधील निसर्गाचे काही खास, काही माझ्या आवडीचे फोटो आज शेअर करत आहे. आज मुद्दाम “निसर्ग” हा विषय निवडण्यामागे एक कारण आहे. “निसर्ग” हा एक असा चमत्कार आहे, की जो अनुभवताना आणि बघताना कायमच हरखून जायला होते व आपण त्याच्यापुढे किती लहान आहोत याची सतत जाणीव होते. कॅमेऱ्याच्या कुपीत कैद केलेले असे कित्येक क्षण नंतर बघताना, त्यावेळेस पाहिलेल्या ठिकाणच्या सर्व आठवणी मनात ताज्या होतात. जगातील अनेक सुंदर ठिकाणांपैकी आपणही काही ठिकाणी बघितली आहेत या विचाराने होणारा आनंद हा देखील काही निराळाच असतो नाही का? 

परत एकदा काहीतरी मनापासून लिहिले आहे जे तुमच्या मनापर्यंत नक्की पोहचेल याची मला खात्री आहे. असेच भरभरून वाचा, आनंद घ्या आणि ते आवडल्यास share करायला आणि comment करायला मात्र विसरू नका. 

धन्यवाद…

सौ. अनुराधा अमरेंद्र उकिडवे.

16 मे 2025.

नॉर्वे – आठवणींचा खजिना

Northern lights-एक जादुई अनुभव… – आठवणींचा खजिना

स्वित्झर्लंड – आठवणींचा खजिना

क्रोएशिया – आठवणींचा खजिना

पर्यटन माहिती – आठवणींचा खजिना

आठवणींचा खजिना.

7

One response to “मनापासून…मनापर्यंत…”

  1. 👌👌👌खजिन्याची श्रीमंती अशीच वाढत जावो आणि जगातील सर्व देशांची वर्णने आणि छायाचित्रे आम्हाला वाचायला व बघायला मिळोत…!!!💐💐💐

लेख कसा वाटला? आपल्या प्रतिक्रिया खालील Comment Box मध्ये नक्की लिहा…

माझ्या विषयी थोडेसे…

नमस्कार, मी सौ.अनुराधा अमरेन्द्र उकिडवे. मी एक गृहिणी आहे. मार्च 2022 मध्ये मी नॉर्वे मध्ये आले. मुळातच मला फिरायची खूप आवड आहे. त्यामुळे इथे आल्यावर लगेचच आम्ही फिरणे चालू केले. मग मला असे जाणवले की नॉर्वे बद्दल भारतात बऱ्याच लोकांना (खास करून माझ्या ओळखीमध्ये) माहीत नाहीये. त्यामुळे मी माझे सर्व अनुभव असलेले लेख लिहायला सुरवात केली. ते सर्व लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावे आणि जो आनंद मला लिहताना मिळतोय तसाच आनंद वाचकांना लेख वाचताना मिळावा याच हेतूने मी माझा ब्लॉग सुरू करत आहे.

Latest Posts



Loading

Contact Info



वाचकांच्या प्रतिक्रिया


Social Links