-
निळाशार देश…
आणखीन चालत अगदी वरच्या टप्प्यावर पोहोचलो तिथे एक पांढऱ्या भिंतीवर निळ्या रंगाचे डोम असलेले चर्च दिसले. इथले वैशिष्ट्य हेच की सर्व चर्चचे डोम निळ्या रंगाचे असते आणि पुढे एकावर एक असलेले मनोरे व त्यामध्ये घंटा बांधलेल्या असतात. चर्चचे डोम व आकाश यांचे रंग एकमेकात अगदी सुंदरतेने मिसळलेले दिसतात.
-
Botanical garden Amsterdam
सकाळपासून हवा तशी ढगाळच होती. सलग तीन दिवस भरपूर फिरल्यामुळे आता खूप दमायला झाले होते त्यामुळे सकाळी लवकर न जाता जरा आरामात हॉटेलमधून Checkout करूनच बाहेर जाऊया असे आम्ही ठरवले. हॉटेलमध्ये luggage Room असल्याने सर्व सामान तिथे ठेवून आम्ही बाहेर पडलो. तिथून थेट Botanical garden बघायला गेलो.