निसर्गरम्य “जोर”

नुकतेच आम्ही सुट्टीसाठी काही दिवस भारतात जाऊन आलो. तेव्हा एका फार्म हाऊस वर आम्ही गेलो. नॉर्वे मध्ये येण्यापूर्वी बऱ्याचदा आम्ही तिथे जाण्याचा विचार करत होतो पण काही ना काही कारणाने जमतच नव्हते म्हणून या वेळेस मात्र आम्ही नक्की ठरवले की तिकडे जायचेच!
पुण्यापासून 110 किलोमीटर व वाईपासून फक्त 26 किलोमीटरवरील “जोर” या गावांमध्ये हे फार्म हाऊस आहे. वाईपासून निघाल्यावर वाटेत लागणारे धोम धरण तसेच आणखीन पुढे गेल्यावर लागणारे बलकवडी धरण हे पाहत आपण फार्म हाऊस वर पोहचतो.


रोजच्या धावपळीपासून थोडा उसंत घेऊन कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी, निसर्गरम्य वातावरण अनुभवण्यासाठी व शांततेसाठी हल्ली प्रत्येक जण काही ना काही जागा शोधत असतो. या सर्वांसाठी हे फार्म हाऊस उत्तम पर्याय आहे. प्रशस्त खोल्या, एका वेळेस पंधरा सोळा जणांची राहण्याची सोय, उत्तम जेवण, “पुस्तक प्रेमींसाठी” पण खास निवडक पुस्तकांची मेजवानी, गिर्यारोहकांसाठी उत्तम ठिकाण, फोटोग्राफीची आवड असलेल्यांसाठी सुद्धा योग्य ठिकाण, शिवाय रात्री चंद्रप्रकाशात नक्षत्र दर्शन करण्यासाठी पण छान जागा!
या सर्व गोष्टींमुळे इथे राहण्यात एक वेगळीच मज्जा येते व खूप प्रसन्न वाटते. इथून परत निघताना प्रत्येकाला परत यावे असे वाटते आणि ही जागा प्रत्येकाच्या मनात घर करून राहते!

तळटीप- सविस्तर माहितीसाठी खाली दिलेल्या नंबर वर संपर्क साधा.
Darshana Deshpande – +91 9923427819
Amol Deshpande – +91 9850839792

सौ. अनुराधा अमरेंद्र उकिडवे.
4-2-2023

लेख कसा वाटला? आपल्या प्रतिक्रिया खालील Comment Box मध्ये नक्की लिहा…

माझ्या विषयी थोडेसे…

नमस्कार, मी सौ.अनुराधा अमरेन्द्र उकिडवे. मी एक गृहिणी आहे. मार्च 2022 मध्ये मी नॉर्वे मध्ये आले. मुळातच मला फिरायची खूप आवड आहे. त्यामुळे इथे आल्यावर लगेचच आम्ही फिरणे चालू केले. मग मला असे जाणवले की नॉर्वे बद्दल भारतात बऱ्याच लोकांना (खास करून माझ्या ओळखीमध्ये) माहीत नाहीये. त्यामुळे मी माझे सर्व अनुभव असलेले लेख लिहायला सुरवात केली. ते सर्व लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावे आणि जो आनंद मला लिहताना मिळतोय तसाच आनंद वाचकांना लेख वाचताना मिळावा याच हेतूने मी माझा ब्लॉग सुरू करत आहे.

Loading

Contact Info



वाचकांच्या प्रतिक्रिया


Social Links