-

सफर मानवनिर्मित जंगलाची…
ही आमची ट्रिप अचानकपणे ठरली होती आणि त्यात योगायोगाने अनपेक्षितपणे एक एक गोष्टी वाढत गेल्या आणि खूप छान आठवणी तयार झाल्या. त्या एका दिवसात खूप छान शांतता, सकारात्मकता मी अनुभवली. साधेपणात देखील एक प्रकारचे सौंदर्य दडलेले होते आणि ते मला जवळून बघता आले.
-

घर घर की बात…
प्रत्येक घरामध्ये मग किमान एकतरी आवडीची, लाडकी जागा तयार होते. कधी दमलेली असताना त्या जागेवर बसून एखादे आवडीचे गाणे ऐकले की खूप उत्साही वाटू लागते. कधीतरी तिथे बसून पटकन पुस्तकाचे एक पान वाचावेसे वाटते, तर कधी हातात मस्त गरमागरम कॉफीचा मग घेऊन बाहेर पडणारा मुसळधार पाऊस बघत बसावासा वाटतो.
-

एक “सुशेगाद” अनुभव…
सूर्याच्या पहिल्या किरणाबरोबर सर्वत्र चैतन्यमयी वातावरण पसरत होते. हवेतील गारठा आणि कोवळे ऊन अंगावर घेत थोडावेळ आम्ही तिथे बसलो होतो. आत्तापर्यंत असे कितीतरी सुंदर क्षण अशा कितीतरी समुद्रकिनाऱ्यांवर घालवले आहेत. तरी प्रत्येक वेळेचा अनुभव काहीना काही एक वेगळी गोष्ट घेऊन येतो असेच मला वाटते.
-

वाट चालावी चालावी…
जसे माणसांमाणसांचे निरनिराळे स्वभाव असतात तसेच मी अनुभवलेल्या प्रत्येक रस्त्याचा देखील एक वेगळा स्वभाव आहे असे मला वाटे. एखादा रस्ता मुळातच इतका शांत की घाई गडबडीची, गाड्यांच्या आवाजाची जणू काही त्याला सवयच नसायची. तर काही ठिकाणी गडबड , आवाजच इतके असायचे की तिथे जर कधी शांतता असेल तर ती शांतता देखील अंगावर यायची.
-

Preikestolen
Norway मध्ये येऊन निसर्गाचा हाच तर एक महत्वाचा नियम मी शिकण्याचा प्रयत्न करत आहे. की निसर्गाशी आपल्याला जुळवून घेता आले पाहिजे. एकदा का तुम्हाला ते गणित जमले की तुमच्यासारखे सुखी तुम्हीच!!! असो, तर या वेळेस तिथे जाण्याचे एक महत्वाचे कारण होते ते म्हणजे, “Preikestolen”!!!
-

मनापासून…मनापर्यंत…
“निसर्ग” हा एक असा चमत्कार आहे, की जो अनुभवताना आणि बघताना कायमच हरखून जायला होते व आपण त्याच्यापुढे किती लहान आहोत याची सतत जाणीव होते. कॅमेऱ्याच्या कुपीत कैद केलेले असे कित्येक क्षण नंतर बघताना, त्यावेळेस पाहिलेल्या ठिकाणच्या सर्व आठवणी मनात ताज्या होतात. जगातील अनेक सुंदर ठिकाणांपैकी आपणही काही ठिकाणी बघितली आहेत या विचाराने होणारा आनंद…
-

Dubrovnik आणि Game of Thrones…
Croatia ट्रीप होऊन आता अर्धे वर्ष होऊन देखील गेले तरीसुद्धा त्या बद्दल म्हणावे तितके पुरेसे लिहिले गेले नव्हते. त्या ट्रीप मधील पहिला लेख लिहिला तो Plitvice बद्दल. अत्यंत सुंदर अशी ती जागा बघून अक्षरशः स्वर्गसुख अनुभवल्याचा आनंद मिळाला. (त्याची लिंक हा लेख संपल्यावर देते.) त्यानंतर बघितलेल्या सर्व जागा देखील छानच होत्या. त्यातीलच अजून एक ठिकाण…
-

मुक्काम पोस्ट Bogstadveien…
“प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी असे एक वळण येते की ते स्वीकारून तुम्ही पुढे गेलात तर तुमचे आयुष्य जास्त सुखकर आणि सोप्पे होते” असे मी ऐकले होते. पण शाब्दिकरित्या देखील हे तंतोतंत खरे ठरेल हे कधी वाटले नव्हते. पण गेले काही महिने, महिनेच काय पण जवळजवळ दीड वर्षे मी असा अनुभव घेत आहे.


