-

घर घर की बात…
प्रत्येक घरामध्ये मग किमान एकतरी आवडीची, लाडकी जागा तयार होते. कधी दमलेली असताना त्या जागेवर बसून एखादे आवडीचे गाणे ऐकले की खूप उत्साही वाटू लागते. कधीतरी तिथे बसून पटकन पुस्तकाचे एक पान वाचावेसे वाटते, तर कधी हातात मस्त गरमागरम कॉफीचा मग घेऊन बाहेर पडणारा मुसळधार पाऊस बघत बसावासा वाटतो.
-

तिच्याबद्दल बोलू काही…
एक कळी जन्माला येते. ज्या क्षणी “तिचा” जन्म होतो त्याचक्षणी जणू काही आयुष्याच्या रंगमंचावर ती प्रवेश करते. हळू हळू कळीचे सुंदर, गोंडस फूल होते. त्याच रंगमंचावर मग “ती” कोवळी पावले टाकत आपली छाप पाडत वावरायला लागते.
-

वाट चालावी चालावी…
जसे माणसांमाणसांचे निरनिराळे स्वभाव असतात तसेच मी अनुभवलेल्या प्रत्येक रस्त्याचा देखील एक वेगळा स्वभाव आहे असे मला वाटे. एखादा रस्ता मुळातच इतका शांत की घाई गडबडीची, गाड्यांच्या आवाजाची जणू काही त्याला सवयच नसायची. तर काही ठिकाणी गडबड , आवाजच इतके असायचे की तिथे जर कधी शांतता असेल तर ती शांतता देखील अंगावर यायची.
-

मनापासून…मनापर्यंत…
“निसर्ग” हा एक असा चमत्कार आहे, की जो अनुभवताना आणि बघताना कायमच हरखून जायला होते व आपण त्याच्यापुढे किती लहान आहोत याची सतत जाणीव होते. कॅमेऱ्याच्या कुपीत कैद केलेले असे कित्येक क्षण नंतर बघताना, त्यावेळेस पाहिलेल्या ठिकाणच्या सर्व आठवणी मनात ताज्या होतात. जगातील अनेक सुंदर ठिकाणांपैकी आपणही काही ठिकाणी बघितली आहेत या विचाराने होणारा आनंद…
-

दुसरी बाजू
आता आमच्यासमोर नवीन आव्हान आहे ते म्हणजे इथल्या थंडीमध्ये राहणे. कारण आम्ही नॉर्वेला येणार हे ऐकूनच बऱ्याच जणांनी आम्हाला सांगितले “नॉर्वेला जात आहात, किमान एक वर्ष तरी राहून दाखवा.” पण हे सर्व स्वीकारताना व मार्ग काढत आनंदाने जगताना एक वेगळीच ऊर्जा आल्यासारखी वाटते आणि खूप छान वाटते.
-

घट्ट नाते…
लहानपणापासूनच आपले व मातीचे नाते किती घट्ट असते नाही का? लहानपणी खेळात मातीचे आकार बनवताना, दिवाळीतील किल्ला करताना किंवा गणपतीची मूर्ती बनवताना देखील आपला व मातीचा संबंध येतो. पावसाळ्यात येणाऱ्या मातीच्या वासाने मन आनंदित होते. ही मुळे घट्ट रुजलेली असतात याचा प्रत्यय मी आज घेतला.
-

सहज मनातलं
कधीतरी अचानक जुने आवडते गाणे लागल्यावर एखादे ठिकाण, एखादी व्यक्ती किंवा एखादा पूर्ण दिवसच लगेच डोळ्यासमोर येतो. मन लगेच त्या आठवणींमध्ये बुडते. मग त्याबरोबर इतरही अनेक आठवणी एका मोगोमाग एक येऊन जातात. मग असे वाटते की परत ते क्षण जगायला मिळाले तर किती मज्जा येईल नाही?
-

भाषेपलीकडील आनंद
आमचे दोन तास कसे गेले ते आमचे आम्हालाच कळले नाही. असे म्हणतात ना की संगीताला भाषेची गरज नसते त्याचा प्रत्यक्ष अनुभव आम्ही काल घेतला.


