नॉर्वे देश फिरायला कसा आहे? किती सुंदर आहे? इथले लोक कसे आहेत? या विषयी आधी बऱ्याच लेखांमध्ये मी उल्लेख केला आहे. त्या एका लेखाची लिंक मी इथे देते.
https://athavaninchakhajina.com/?p=1570
नॉर्वे मधली काही महत्त्वाच्या लिंक्स आणि माहिती खालील पेज वर दिली आहे:
https://athavaninchakhajina.com/?p=1574
नॉर्वे फिरायला जाण्याचे ठरल्यावर मनात आलेले काही प्रश्न, मनातले काही गोंधळ हे सर्व अगदी स्वाभाविक आहे. खूप जणांनी मला देखील काही गोष्टी विचारल्या, काही सांगितल्या. अनेक जणांचे काही समज, गैरसमज दूर करण्यासाठी काहीतरी लिहू असा विचार मनात आला. त्यामुळे आजचा लेख हा जरा वेगळ्या धाटणीचा आहे. Oslo आणि आजूबाजूला असणाऱ्या काही जागा, Oslo मध्ये असणाऱ्या सोयी या विषयी सविस्तर माहिती लिहण्याचा मी प्रयत्न करते.
1. इतर युरोपियन देश डोळ्यासमोर ठेवून नॉर्वे मध्ये आलात तर नक्कीच तुम्हाला सगळ्याच बाबतीत फरक जाणवेल. कारण मागे एकदा मी म्हणल्याप्रमाणे नॉर्वे म्हणजे अमर्यादित, अविस्मरणीय निसर्गसौंदर्याने नटलेला एक श्रीमंत देश! त्यामुळे इथला निसर्ग व काही जुन्या सवयी जपण्याकरिता इथले सर्वजण जास्त मेहनत घेताना दिसतात.
2. भारतातून नॉर्वे मध्ये यायला अजून तरी Direct flight नाहीये. Flight बदलून यावे लागते. भारतातून ऑस्लो पर्यंत प्रवासाचा वेळ हा साधारण 15-16 तास होतो.
3. विमानतळावर किंवा बाहेर काही दुकानांमध्ये Simcard मिळते पण काही दिवसांसाठीच येणार असाल तर येतानाच International Roaming करून आलेले चांगले.
4. Oslo मधील अनेक ठिकाणे उत्तम प्रकारे Public transport नी जोडलेली आहेत. त्यामुळे गाडी शिवाय देखील बऱ्याच जागा तुम्ही छान फिरू शकता.
5. Oslo मध्ये असाल तर मोबाइलवरती Ruter नावाचे ॲप ज्यावरून तिकीट काढू शकता किंवा वेगवेगळे pass देखील त्यावर काढता येतात. शिवाय यावरून तिकीट काढल्यावर Oslo मधील बस, ट्राम, रेल्वे, मेट्रो, काही भागातील फेरीबोट या सगळ्यामध्ये Ruter चे तिकीट चालतें. किंवा मोबाईल वर काढायचे नसेल तर काही ठराविक दुकानांमध्ये त्याचे card मिळते. पण त्या card साठी 50 NOK अधिक खर्च येतो.
6. हल्ली सर्व ठिकाणी वाढलेल्या महागाईतून नॉर्वे कसा काय वंचित राहील? आधीच इतर देशांपेक्षा हा देश जरा जास्त महाग आहे. त्यामुळे त्याची मनात तयारी ठेवूनच यावे. 2022 मध्ये आम्ही नॉर्वेला आलो. त्याहून देखील अजून महागाई वाढलेली आम्हाला दिवसेंदिवस जाणवते.
7. Hop on hop off tour घेण्यापेक्षा आपले आपण Public transport घेऊन फिरलो तरी ते जरा स्वस्त आणि सोयीचे पडते. अगदीच तुमच्याकडे फिरायला फक्त 3-4 तास किंवा अर्धा दिवस आहे तर Hop on hop off हा पर्याय घेण्यास हरकत नाही असे मला वाटते.
8. नॉर्वे फिरायला येण्यासाठी June ते September हा काळ चांगला. या काळात उन्हाळा चांगला असल्याने फिरण्यासाठी जास्त पर्याय असतात.
9. Northern lights पाहण्यासाठी November पासून April पर्यंत यावे. पण खूप जास्त थंडीची आणि बर्फाची मात्र तयारी ठेवूनच यावे.
10. नॉर्वे मध्ये लोकसंख्या खूप कमी आहे. तसेच नॉर्वे मध्ये निसर्ग संवर्धनाला पर्यटकांच्या सोईपेक्षा जास्ती महत्व दिले गेले आहे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी खाण्याच्या सोयीची कमतरता जाणवू शकते. त्यामुळे कुठेही जाताना बरोबर खाण्याचे पदार्थ, पाणी इत्यादि बरोबर ठेवावेच लागते.
11. ऋतुमानानुसार नॉर्वे मध्ये येताना आणवायाच्या गोष्टींची यादी-
In Summer (May/June – August/September)
1. Waterproof shoes
2. Woolen socks (in case you are prone to get cold)
3. Thermal wear
4. Sweaters
5. Jacket (if its not waterproof then carry rain poncho)
6. Swimming costume – If water temperature is suitable, swimming in fjord or a lake(If it is allowed) is an amazing experience.
7. Moisturizer, lip balm
8. Sunglasses
9. Cap
10. Umbrella
In Winter (September/October – April/May)
1. Winter shoes (ankle height)
2. Snow grippers/ spikes
3. Toe warmers
4. Hand gloves
5. Winter jacket
6. Thermal wear
7. Winter Cap
8. Woolen Scarf/ muffler
Oslo मधील काही फिरण्याची ठिकाणे –
1. Vigeland park – या बागेचे वैशिष्ट्य हेच आहे की या पूर्ण बागेमध्ये Famous Norwegian Artist Gustav Vigeland ह्यांनी बनवलेली शिल्पे आहेत. ही सर्व शिल्पे bronze, Granite, Cast Iron पासून बनवलेली असून निरनिराळ्या भावना त्यात सुंदर प्रकारे दाखवल्या आहेत. अगदी लहान बाळापासून प्रत्येक वयोगटातील व्यक्तीगणीक बदलणाऱ्या भावभावनांचे दर्शन प्रत्येक शिल्पामधुन होताना दिसते.
https://athavaninchakhajina.com/?p=1604 या वर मी लिहलेले वर्णन वाचायला मिळेल.
2. Botanical garden – येथील विविधरंगी फुले, निरनिराळी झाडे, निरनिराळ्या प्रदेशातील वनस्पती बघताना आपण अगदी हरखून जातो. याचा वापर शिक्षणासाठी, संशोधनासाठी देखील केला जातो. 4500 हून आधिक वनस्पती आणि zoology, geology and climate विषयांवरील प्रदर्शने आणि नॉर्वेचे सर्वात मोठे नैसर्गिक ऐतिहासिक संग्रहालय इथे बघायला मिळेल.
https://www.nhm.uio.no/ या लिंक वर सविस्तर माहिती वाचायला मिळेल.
3. Deichman Bjørvika – हे Oslo मधील मुख्य वाचनालय आहे. फक्त वाचनप्रेमीच नाही तर सर्वांनी आवर्जून बघावी अशीच ही जागा आहे. फक्त वाचन नाही तर त्याबरोबर संगीत, खेळ, चित्रपट व इतर अनेक अनेक क्षेत्रांना प्रोत्साहन देऊन लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आकर्षित होतील अशी व्यवस्था व सोयी इथे उपलब्ध आहेत. मी लिहलेल्या लेखाची लिंक खाली दिली आहे.
https://athavaninchakhajina.com/?p=783
4. Ekeberg park – Oslo मुख्य शहरापासून अगदी जवळ म्हणजे tram नी साधारण 20-25 मिनिटे जाऊन ही सुंदर जागा आहे. निवांत बसून Oslo शहर, fjord, Sunset बघत बसण्यात एक वेगळीच मज्जा येते. tram मधून उतरल्यावर थोडा चढ चढून जसे जसे आपण चालत जातो तसे sculptures, artwork बघायला मिळते. कोणत्याही ऋतुत गेले तरी सुंदर निसर्ग आपल्याला मोहवून टाकतो.
5. Oslo Opera House – Opera, Ballet, Concert व्यतिरिक्त इथे निरनिराळ्या tours चा देखील आनंद तुम्ही घेऊ शकता. English, Norwegian आणि German भाषांमधील या tours मधून वास्तुकला, स्टेज तंत्रज्ञान, अनेक पडद्या मागच्या कथा या विषयी जाणून घेता येते.
या इमारतीची रचना देखील आकर्षक असून त्या इमारतीच्यावरून देखील आजूबाजूच्या परिसराचे उत्तम दर्शन घडते.
https://www.operaen.no/
6. The Royal Palace – हा Palace देशातील सर्वात महत्त्वाच्या एकल इमारतींपैकी एक आहे आणि 1814 नंतर Norwegian इतिहासाचे एक महत्त्वाचे प्रतीक आहे. शहराच्या मध्यभागी असलेले हे सुंदर Palace आणि आजूबाजूचा बागेचा परिसर शिवाय Norwegian आणि English भाषेतील guided tours घेऊन तुम्ही Palace चा आनंद घेऊ शकता.
https://www.royalcourt.no/seksjon.html?tid=80428&sek=179512
7. National Theatre – 125 वर्षांपासून म्हणजेच 1 सप्टेंबर 1899 ला सुरू झालेले हे National Theater म्हणजे Norwegian लोकांसाठी एक मानाचा विषयच म्हणावा लागेल. Metro station, Tram station पासून अगदी जवळ असलेल्या या इमारतीचा परिसर कोणत्याही ऋतुत सर्वांना आकर्षित करतो. निरनिराळे events, shows, tours इथे सतत चालूच असतात. त्याबद्दल आधिक माहितीसाठी लिंक दिली आहे.
https://www.nationaltheatret.no/hva-skjer/omvisninger/english-guided-tours/
8. Akershus Fortress – 13 व्या शतकात बांधलेला हा अतिशय सुंदर किल्ला आहे. संपूर्ण किल्ला, किल्ल्याचे बांधकाम बघताना आणि इथला इतिहास जाणून घेताना आपण देखील त्या काळात हरवून जातो. इथला संपूर्ण परिसर बघून आपण जेव्हा किल्ल्याच्या तटावर येतो तेव्हा तिथून दिसणारे fjord, बंदराचा नजराणा बघतच बसावा असे वाटते.
9. Bærums Verk – Oslo city center पासून एका तासावर असलेले हे एक छोटेसे गाव. या गावाला 400 वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. विविध ऋतूनुसार इथे अनेक उपक्रम राबवले जातात. मातीच्या मूर्ती, काचेच्या वस्तू, शिलाई काम असे सर्व उत्साही पर्यटकांना शिकवले जाते; त्याचप्रमाणे जुन्या लोह उद्योगाचे प्रतीक म्हणून लहान मुलांना आजही तिथे लहान लहान लोखंडी वस्तू ऐरणी वर बनवायला शिकवतात. माझा अनुभव वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर जा.
https://athavaninchakhajina.com/?p=680
10. Snarøya – एक सुंदर निसर्गरम्य ठिकाण जे पाहताक्षणी आवडावे, अगदी असेच हे ठिकाण. बस मधून उतरल्यावर 5 मिनिटे चालत गेल्यावर लगेच इथल्या निसर्गाचे दर्शन घडते. अथांग पसरलेल्या fjord च्या साथीने एका छोट्याशा पायवाटेने चालत जाताना प्रत्येकजण रममाण होतो. नक्की पहावे असेच हे एक ठिकाण.
https://athavaninchakhajina.com/?p=1697
11. Bygdøy – निसर्ग, उत्तम संग्रहालये, समुद्रकिनारे ह्या सर्वांनी नटलेला हा परिसर. खास करून The Fram Museum, Norwegian Folk Museum ही दोन संग्रहालये नक्कीच पहावी अशी. नेहमीपेक्षा वेगळ्या धाटणीची असल्यामुळे बघताना वेळ कसा जातो हेच समजत नाही.
*Fram Museum मध्ये 19 व्या शतकात Amundsen आणि Nansen ह्यांनी केलेल्या Polar exploration बद्दल सर्व माहिती समजते. इथले सगळ्यात मोठे आकर्षण आहे त्या काळातील जतन केलेली लाकडी जहाजे. अगदी आगळे वेगळे असे हे museum आवर्जून पहावे.
*Norwegian Folk Museum हे युरोपमधील सर्वात मोठे आणि सर्वात जुने ओपन-एअर संग्रहालय आणि सांस्कृतिक इतिहासाचे राष्ट्रीय संग्रहालय आहे, ज्याची स्थापना 1894 मध्ये झाली आहे. मध्ययुगापासून ते आजपर्यंतची सुंदर वेगवेगळी घरे इथे बघायला मिळतात. Oscar II’s collection, the countryside and the Old Town या तीन भागामध्ये हे संग्रहालय विभागलेले आहे.
12. फेरी बोटीतून फेरफटका मारून काही सुंदर जागी जाऊन तिथली सुंदर आकर्षक घरे, काही ऐतिहासिक इमारती, स्थानिक लोकांची घरे, काही सुंदर कॅफे यांचा परिपूर्ण अनुभव घेण्यासाठी Gressholmen, Lindøya, Hovedøya, Malmøya, Drøbak, Nesøya यांसारखे अनेक पर्याय आहेत. प्रत्येक ठिकाण वेगळे तरी एका पेक्षा एक सुंदर असाच अनुभव येतो.
ही सर्व ठिकाणे Oslo मधील आहेत. या व्यतिरिक्त देखील Oslo च्या आसपास देखील अजूनही खूप जागा बघण्यासारख्या आहेत. पण त्यातल्या त्यात काही महत्त्वाच्या आणि मी बघितलेल्या जागा म्हणून एवढ्याच जागा आणि त्याविषयी थोडक्यात माहिती देण्याचा मी प्रयत्न केला आहे. तसा विचार केला तर नॉर्वे फिरू तेवढे कमीच आहे असेच सतत वाटते. पण एक मात्र नक्की सांगेन की 4 दिवस असो वा 4 वर्ष, नॉर्वे बघताना, फिरताना जो काही आनंद आणि समाधान मिळते त्याची तुलना कशाशीच होणे नाही…
नॉर्वे मधील मी बघितलेली अजून काही ठिकाणे आणि त्याविषयी मी लिहलेले लेख –
नॉर्वे – आठवणींचा खजिना (athavaninchakhajina.com)
सौ. अनुराधा अमरेंद्र उकिडवे.
25.6.2024