-

मनापासून…मनापर्यंत…
“निसर्ग” हा एक असा चमत्कार आहे, की जो अनुभवताना आणि बघताना कायमच हरखून जायला होते व आपण त्याच्यापुढे किती लहान आहोत याची सतत जाणीव होते. कॅमेऱ्याच्या कुपीत कैद केलेले असे कित्येक क्षण नंतर बघताना, त्यावेळेस पाहिलेल्या ठिकाणच्या सर्व आठवणी मनात ताज्या होतात. जगातील अनेक सुंदर ठिकाणांपैकी आपणही काही ठिकाणी बघितली आहेत या विचाराने होणारा आनंद…
-

सफर Lofoten ची…
डोंगरांमधून वाहत असलेले धबधबे, पांढरे गुळगुळीत दगड, काही दगडांवर उगवलेल्या वनस्पती, झाडे हे सर्वच म्हणजे डोळ्यांसाठी एक सोहळाच जणू! मला इथली अजून एक गंमत वाटते ती म्हणजे, एकीकडे बघितले तर जाता जाता वाटेतील दिसणारा एक साधा दगड देखील लक्षवेधी ठरवा, तर दुसरीकडे अथांग, अमर्यादित पसरलेल्या डोंगरांमुळे असे कित्येक क्षण आनंददायी ठरावेत.
-

Flam – Bergen
काही प्रवास असे असतात की जे कायम आठवणीत राहतील. नॉर्वेतील एका सुंदर ठिकाणी जाण्याचा नुकताच योग आला. इथे आल्यापासून बऱ्याच जणांनी सुचवलेले व नॉर्वेत आल्यावर प्रत्येकानी एकदा तरी बघायलाच पाहिजे असे हे ठिकाण म्हणजे Flam!
