-

मनापासून…मनापर्यंत…
“निसर्ग” हा एक असा चमत्कार आहे, की जो अनुभवताना आणि बघताना कायमच हरखून जायला होते व आपण त्याच्यापुढे किती लहान आहोत याची सतत जाणीव होते. कॅमेऱ्याच्या कुपीत कैद केलेले असे कित्येक क्षण नंतर बघताना, त्यावेळेस पाहिलेल्या ठिकाणच्या सर्व आठवणी मनात ताज्या होतात. जगातील अनेक सुंदर ठिकाणांपैकी आपणही काही ठिकाणी बघितली आहेत या विचाराने होणारा आनंद…

