Baerums Verk हे नॉर्वेमधील ऑस्लो जवळील एक गाव आहे. हे लोम्मा नदीच्या दोन्ही बाजूंनी वसलेले असून त्याची लोकसंख्या सुमारे ८००० आहे. हे वाईकेन काउंटी मधील बॅरुम नगरपालिकेतील एक ठिकाण आहे.
या गावाला चारशे वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. येथे पहिले प्रगलन केंद्र (Smelting Cabin)१६१० मध्ये बांधले गेले. १६०३-१६०४ मध्ये vestre burgam येथे लोह खनिजाचा आशादायक शोध लागला. १६१०मध्ये राजा क्रिश्चन चौथा याने राजाचे खाण-तज्ञ पॉल स्मेल्टर यांना स्वखर्चावर बॅरूम मध्ये smelting चे काम करण्यासाठी करारबद्ध केले. येथेच नॉर्वेमधील पहिली वात्या भट्टी(ब्लास्ट फर्नेस) १६२२ मध्ये स्थापित करण्यात आली. त्यानंतर हा परिसर लोहउद्योगास पूरक असल्याने भरभराटीस आला. अनेक घराण्यांमधून खांदेपालट होत या उद्योगाचा विकास झाला. १७००-१७२१ च्या दरम्यान झालेल्या ग्रेट नॉर्डिक वॉर मध्ये याची महत्त्वाची भूमिका होती. १९८० मध्ये या परिसरातील घरांचा विकास झाला, लोकसंख्या वाढली व नवीन युगाचा जन्म झाला. १९९७ मध्ये कारखान्याच्या जुन्या इमारती दुकाने व सेवा संस्था पुन्हा बांधल्या गेल्या. हा परिसर हस्तकला आणि हस्त उद्योगाचे केंद्र बनला. ह्या गावाला एप्रिल १९९८ मध्ये आंतरराष्ट्रीय पारितोषिक दिले गेले.
पूर्वी जिथे जुने कारखान्याचे बांधकाम होते तिथे आता आधुनिक दुकाने आहेत. दुकाना व्यतिरिक्त तिथला परिसर हा 30 हून अधिक कला शिल्पांनी (sculptures) सजला आहे. विविध ऋतूनुसार इथे अनेक उपक्रम राबवले जातात. मातीच्या मूर्ती,काचेच्या वस्तू, शिलाई काम उत्साही पर्यटकांना शिकवले जाते; त्याचप्रमाणे जुन्या लोह उद्योगाचे प्रतीक म्हणून लहान मुलांना आजही तिथे लहान लहान लोखंडी वस्तू ऐरणी वर बनवायला शिकवतात. जुना Baerum Verk चा नयनरम्य परिसर आज नॉर्वेचा व्यापार,हस्तकला व इतिहासासाठी सर्वात विशिष्ट व जिवंत केंद्रांपैकी एक आहे.