-

सफर Geiranger, Åndalsnes आणि Ålesund ची…
सतत एकामागून एक ठिकाणे बघताना मध्येच कधीतरी असे शांत बसणे मला आवडते. त्या वेळात काही न करता, कोणताही विचार न करता बसून राहणे व जे काही समोर येईल ते बघत राहणे हेच योग्य असते. आमच्यासमोर अनेक जण येत-जात होते. जणू काही आमच्यासमोर पडदा उघडलाय आणि नाटकाचा एक अंक सादर होत आहे असेच वाटत होते. अर्थात…
-

वाट चालावी चालावी…
जसे माणसांमाणसांचे निरनिराळे स्वभाव असतात तसेच मी अनुभवलेल्या प्रत्येक रस्त्याचा देखील एक वेगळा स्वभाव आहे असे मला वाटे. एखादा रस्ता मुळातच इतका शांत की घाई गडबडीची, गाड्यांच्या आवाजाची जणू काही त्याला सवयच नसायची. तर काही ठिकाणी गडबड , आवाजच इतके असायचे की तिथे जर कधी शांतता असेल तर ती शांतता देखील अंगावर यायची.
-

मनापासून…मनापर्यंत…
“निसर्ग” हा एक असा चमत्कार आहे, की जो अनुभवताना आणि बघताना कायमच हरखून जायला होते व आपण त्याच्यापुढे किती लहान आहोत याची सतत जाणीव होते. कॅमेऱ्याच्या कुपीत कैद केलेले असे कित्येक क्षण नंतर बघताना, त्यावेळेस पाहिलेल्या ठिकाणच्या सर्व आठवणी मनात ताज्या होतात. जगातील अनेक सुंदर ठिकाणांपैकी आपणही काही ठिकाणी बघितली आहेत या विचाराने होणारा आनंद…
-

Loppe market…
खरेदी हा तसा खूप जणांचा अगदी आवडीचा विषय. विशेष करून काही महिलांसाठी तर हा अगदी जिव्हाळ्याचाच विषय म्हणावा लागेल. वयोगट कोणताही असो पण एखादी हवीहवीशी गोष्ट मनासारखी मिळाली तर आनंद हा प्रत्येकाला होतोच आणि जर काही आवडीच्या, जुन्या-नव्या अश्या नानाविध वस्तूंचा खजिना जर एकाच ठिकाणी सापडला तर काय सोन्याहून पिवळे नाही का? नॉर्वेमध्ये राहून अशाच…
-

मुक्काम पोस्ट Bogstadveien…
“प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी असे एक वळण येते की ते स्वीकारून तुम्ही पुढे गेलात तर तुमचे आयुष्य जास्त सुखकर आणि सोप्पे होते” असे मी ऐकले होते. पण शाब्दिकरित्या देखील हे तंतोतंत खरे ठरेल हे कधी वाटले नव्हते. पण गेले काही महिने, महिनेच काय पण जवळजवळ दीड वर्षे मी असा अनुभव घेत आहे.
-

मंत्रमुग्ध करणारे संगीत…
सूर्यास्ताच्या वेळी हळूहळू अंधार होत असताना, पक्षी घरट्याकडे परत जात असताना पॅलेसचा संपूर्ण परिसर संगीतमय झाला होता. एक वेगळाच “माहोल” काल अनुभवायला मिळाला.
-

नॉर्वे विषयी काही…
नॉर्वे फिरायला जाण्याचे ठरल्यावर मनात आलेले काही प्रश्न, मनातले काही गोंधळ हे सर्व अगदी स्वाभाविक आहे. खूप जणांनी मला देखील काही गोष्टी विचारल्या, काही सांगितल्या. अनेक जणांचे काही समज, गैरसमज दूर करण्यासाठी काहीतरी लिहू असा विचार मनात आला
-

Northern lights-एक जादुई अनुभव…
एकदा का या सगळ्या गोष्टी व नशीब अशी एकत्र भट्टी जमून आली आणि प्रत्यक्ष डोळ्यांना Northern lights दिसले तर त्यावेळेस होणारा आनंद हा शब्दात सांगणे हे मात्र कठीणच जाते. कितीही वेळा बघितले तरी प्रत्येक वेळी बघताना होणारा आनंद हा काही वेगळाच असतो व अशी वेळ परत परत यावी आणि परत परत बघता यावे अशी इच्छा…


