दरवर्षी प्रमाणेच या वर्षी देखील म्हणजे काल रात्री (18 August) Oslo Folk festival साठी Royal Palace समोर एक Concert होते. 2017 पासून याची सुरुवात झाली. या वर्षीचे हे सहावे वर्ष होते. कार्यक्रम 8.30 वाजता सुरू होणार होता आणि तसा सुरू झालाही. हे मुद्दाम सांगायचे कारण की मंचावर उपस्थित प्रत्येकामध्ये तसेच मंचामागे असणाऱ्या प्रत्येक माणसामध्ये वेळेचे नियोजन इतके होते की कार्यक्रमाची सुरुवात होऊन, सर्वांचे स्वागत करून, एक छोटेसे भाषण होऊन बरोब्बर 8.30 वाजता पाहिले सूर कानावर पडले. महत्त्वाचे म्हणजे हे Concert “विनामूल्य” होते. अगदी पहिल्यापासून ते शेवटपर्यंत सर्वच इतके नियोजनपूर्वक होते की त्यामध्ये कुठेही गडबड, गोंधळाचा मागमूस देखील नव्हता.
सुरुवातच एवढी दणक्यात झाली की पहिल्या सादरीकरणाबरोबरच सर्व वादकांनी प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेतला. Royal palace समोर मध्यभागी मोठे स्टेज व त्याच्या दोन्ही बाजूला मोठे मोठे स्क्रीन लावले होते. Concert साठी गर्दी खूप होती. खुर्च्या तर पूर्णपणे भरून गेल्याच होत्या पण त्याचबरोबर आजूबाजूचा संपूर्ण बागेचा परिसर देखील प्रेक्षकांनी भरला होता. त्यामुळे कडेच्या लॉनवर एक कोपरा पकडून आम्ही बसलो. सर्व सादरीकरण करणारे वादक आणि त्यांना ऐकताना-पाहतानाचे प्रेक्षक, खरे सांगायचे तर तेथे उपस्थित असलेला प्रत्येकजणच सुरांमध्ये बुडून गेला होता. Alpesh Chauhan यांनी संपूर्ण Conert उत्तम तऱ्हेने Conduct केले होते. त्यांच्या देहबोलीवरून, मंचावरील वावरावरून, बोलण्यातून त्यांच्या प्रत्येक श्वासाश्वासात संगीत भिनले आहे असेच वाटत होते.
सूर्यास्ताच्या वेळी हळूहळू अंधार होत असताना, पक्षी घरट्याकडे परत जात असताना पॅलेसचा संपूर्ण परिसर संगीतमय झाला होता. एक वेगळाच “माहोल” काल अनुभवायला मिळाला. 1.15 तासानंतर या सुरेल Conert ची सांगता झाली. Conert संपले पण प्रेक्षकांच्या टाळ्या, शिट्ट्या मात्र थांबत नव्हत्या. आता लवकरच नॉर्वे मधील Summer संपणार आणि परत Winter येणार अशी चुटपुट प्रत्येकाच्या मनामध्ये असतानाच अश्या एका सुरेल Concert ने सर्वजण परत एकदा आनंदी, उत्साही झाले असेच वाटत होते. कायम स्मरणात राहतील असे काही मोजकेच क्षण आयुष्यात येतात. मी काल अनुभवलेला प्रत्येक क्षण हा अगदी तसाच होता. कायम हवाहवासा वाटणारा आणि कायम स्मरणात राहील असाच!!!
सौ. अनुराधा अमरेंद्र उकिडवे.
19.8.2024