Botanical garden Amsterdam

(या आधील सर्व भाग वाचण्यासाठी सर्व links शेवटी दिल्या आहेत.)

सकाळपासून हवा तशी ढगाळच होती. सलग तीन दिवस भरपूर फिरल्यामुळे आता खूप दमायला झाले होते त्यामुळे सकाळी लवकर न जाता जरा आरामात हॉटेलमधून Checkout करूनच बाहेर जाऊया असे आम्ही ठरवले. हॉटेलमध्ये luggage Room असल्याने सर्व सामान तिथे ठेवून आम्ही बाहेर पडलो. तिथून थेट Botanical garden बघायला गेलो.
1634 ते 1637 च्या काळात Netherlands मधील Leiden व Utrech या भागांमध्ये आलेल्या प्लेग च्या साथीमुळे बरेच जण दुसरीकडे राहायला जात होते. Amsterdam मध्ये औषधी झाडे लावण्यासाठी पुरेशी जागा नव्हती. त्यामुळे 1638 मध्ये City municipality ने “Hortus Botanicus” नावाने Botanical garden उभे केले. Dutch East India company ने जगभरातून औषधी वनस्पती व झाडे आणून तेथे लावली. यातील बऱ्याच जुन्या वनस्पती आजही येथे आहेत. 6000 पेक्षा जास्त झाडे असून, काही वनस्पती 300 वर्ष जुन्या आहेत. याचे वेगळेपण म्हणजे येथे 3 पद्धतीचे म्हणजेच उपोष्णकटिबंधीय, उष्णकटिबंधीय व वाळवंट येथील हवामान, हवामानानुसार आढळणाऱ्या वनस्पती असलेले ग्रीन हाऊस आहेत. हे सर्व बघणे हा एक उत्तम अनुभव होता. ही सर्व ग्रीन हाऊस आतून एकमेकांना जोडली गेली असल्यामुळे हवामानातील बदल पण चटकन जाणवत होता. या संपूर्ण परिसरामध्ये खूप शांतता तर होतीच पण निसर्गाच्या सहवासात सर्वत्र सकारात्मक ऊर्जा पसरली होती. निसर्ग हा सर्वात मोठा गुरु आहे असे मला वाटते. आता इथलेच उदाहरण बघा ना काही झाडे लहान, काही मोठी, काही जुनी तर काही नवीन असली तरी आहे ती परिस्थिती स्वीकारून कोणताही भेदभाव न करता सर्वांनी मिळून पुढे जायचे, वाढायचे हा निसर्गाचा गुण आपण सर्वांनी घेतला पाहिजे नाही का?


प्रत्येक वनस्पती, त्याची नावे, गुणधर्म किंवा त्या वनस्पतीचे किती औषधी महत्त्व आहे याची जाणीव हे सर्व बघताना होते. या शिवाय फुलपाखरांचे जीवनचक्र या विषयातील माहिती देण्यासाठी इथे एक स्वतंत्र कक्ष आहे. जसे आम्ही पुढे जात होतो तश्या इथल्या एक एक गोष्टी उलगडत होत्या. सर्व परिसर बघून आम्ही निघालो. आता पाऊस सुरू झाला होता त्यामुळे अजून कुठे वेळ न घालवता जरा लवकरच आम्ही विमानतळावर जायला निघालो. पावसामुळे, वाऱ्यामुळे जरा गारठा जाणवत होता.
Airport ला बराच वेळ मिळाला तेव्हा संपूर्ण प्रवासात काढलेले फोटो, व्हिडिओ बघत असताना मला एक गोष्ट जाणवली की, काही ठिकाणे खूप सुंदर असतात पण निसर्ग, त्याची सुंदरता, त्यातील वेगळेपणा या व्यतिरिक्त एका वेगळ्याच व चुकीच्या कारणासाठी ही ठिकाणे ओळखली जाऊ लागतात. मुळात कोणतेही एखादे ठिकाण कधीच वाईट नसते. काही प्रमाणात स्थानिक व्यक्ती किंवा तिथे येणारे पर्यटक यांनी केलेल्या चुकीच्या वागणुकीमुळे त्या ठिकाणचे नाव खराब होते. मला असे वाटते की Amsterdam मध्ये पण तसेच काहीसे झालेले आहे. कारण या पूर्ण तीन-चार दिवसाच्या प्रवासात असंख्य व्यसनी लोक, सार्वजनिक ठिकाणी फिरताना केलेले गैरवर्तन, काही ठिकाणी दिसणारी अस्वच्छता या गोष्टी मात्र खटकत होत्या. हे जरी असेल तरी आम्ही पाहिलेली ठिकाणे, तिथली सकारात्मकता व त्यातून मिळणारा आनंद ह्याच सर्व गोष्टी मनात साठवून आम्ही प्रवासाची सांगता केली.

समाप्त.

सौ. अनुराधा अमरेंद्र उकिडवे.
31.5.2023.

ह्या सदरातील आधीचे लेख :
Easter ची सुट्टी आणि Amsterdam – आठवणींचा खजिना (athavaninchakhajina.com)
Zaanse Schans – आठवणींचा खजिना (athavaninchakhajina.com)
Keukenhof – आठवणींचा खजिना (athavaninchakhajina.com)
Brussels – आठवणींचा खजिना (athavaninchakhajina.com)

लेख कसा वाटला? आपल्या प्रतिक्रिया खालील Comment Box मध्ये नक्की लिहा…

माझ्या विषयी थोडेसे…

नमस्कार, मी सौ.अनुराधा अमरेन्द्र उकिडवे. मी एक गृहिणी आहे. मार्च 2022 मध्ये मी नॉर्वे मध्ये आले. मुळातच मला फिरायची खूप आवड आहे. त्यामुळे इथे आल्यावर लगेचच आम्ही फिरणे चालू केले. मग मला असे जाणवले की नॉर्वे बद्दल भारतात बऱ्याच लोकांना (खास करून माझ्या ओळखीमध्ये) माहीत नाहीये. त्यामुळे मी माझे सर्व अनुभव असलेले लेख लिहायला सुरवात केली. ते सर्व लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावे आणि जो आनंद मला लिहताना मिळतोय तसाच आनंद वाचकांना लेख वाचताना मिळावा याच हेतूने मी माझा ब्लॉग सुरू करत आहे.

Loading

Contact Info



वाचकांच्या प्रतिक्रिया


Social Links