(या आधीचे दोन्ही भाग वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.)
Easter ची सुट्टी आणि Amsterdam – आठवणींचा खजिना (athavaninchakhajina.com)
Zaanse Schans – आठवणींचा खजिना (athavaninchakhajina.com)
1638 मध्ये Dutch East India company च्या अधिकाऱ्याने म्हणजेच Adriaen Maertensz Block यांनी Slot Teylingen हे Castle विकत घेतले. 1641 मध्ये तिथे मोठे manor बांधले ज्याला नाव दिले “Keukenhof”!
“Keukenhof” म्हणजे kitchen garden! या बागेमध्ये castle साठी लागणारी फळे, भाज्या लावल्या जात. हळू हळू या बागेचे स्वरूप बदलून 1949 मध्ये पहिल्यांदा इथे फुलांचे प्रदर्शन भरवले. त्या प्रदर्शनात Tulip या फुलांचा वापर केला. सर्वांना ही फुले एवढी आवडली की तेव्हापासून बऱ्याच घरांमध्ये, बागेमध्ये ही फुले वापरली जाऊ लागली. त्यानंतर काळानुसार बदल होत होत या बागेचे दरवाजे सर्वांसाठी खुले झाले ते वर्ष होते 1950. तेव्हापासून आतापर्यंत अनेक जणांनी एकत्र येऊन केलेल्या मेहनतीची “फुले” बघण्यासाठी दरवर्षी मार्च ते मे या काळात कित्येक लोकांचे पाय या ठिकाणी वळतात. म्हणूनच असेल याला “Garden of Europe” असे म्हणतात. असे का म्हणतात त्याचा प्रत्यय आम्हाला ही जागा बघताना आलाच.
सकाळी जास्त गर्दी होण्याच्या आधी आम्ही लवकर बस मधून निघालो. Long weekend असल्यामुळे सर्वत्र गर्दी दिसत होती. तिकिटे आम्ही आधीच ऑनलाईन काढून ठेवली होती म्हणून बरे झाले. वाटेत खूप धुके होते. धुक्यातून वाट काढत बस चालली होती. बस वरती आकर्षक फुलांची चित्रे काढली होती. साधारणपणे एक तास प्रवास करून आम्ही Keukenhof ला पोहचलो. आत गेल्या गेल्या एका टेबल वर या बागेचा नकाशा ठेवला होता. सकाळपासून गडबडीने निघाल्यामुळे इथे येऊन तर पोहचलो पण आता थोडी थोडी भुकेची जाणीव होऊ लागली होती. आधी काहीतरी खाऊन घेऊ म्हणून त्यातल्या त्यात कमी गर्दीचे ठिकाण शोधले. एके ठिकाणी बसता येईल अशी जागा मिळाली. मस्त गरम गरम Coffee व Apple pie घेतले. Dutch Apple pie हे प्रसिद्ध आहे कारण हे साखर, मैदा, लोणी, काही मसाले, ओट्स आणि नट्स यापासून बनवलेले असते. त्यामुळे आम्ही असे ऐकले होते की इथे गेला तर हे नक्की खा. आम्हाला पण ते खूप आवडले.
खाऊन तरतरी आल्यावर खऱ्या अर्थाने आम्ही फुले बघायला सुरुवात केली. निरनिराळी लहान, मोठी फुले दिसू लागली. प्रत्येक फुलांच्या ताटव्याची रचना वेगळी, रंगसंगती वेगळी, प्रत्येक रंग दुसऱ्या रंगासोबत उठून दिसत होता. कुठे लाल-पिवळी फुले एकत्र, कुठे पांढरी-गुलाबी रंगाची फुले एकत्र त्यामुळे सर्वत्र झालेली रंगांची उधळण बघण्यात आम्ही रमून गेलो. हिरव्यागार गवतावर पडलेल्या रंगीबिरंगी पाकळ्या सुद्धा सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या. यावर्षी थंडी जास्त वाढल्याने Tulip ची फुले पूर्णपणे उमलली नव्हती.
पुढे एक पवनचक्की होती. त्यावर जाऊन सर्व आजूबाजूचा परिसर बघितला. पवनचक्की च्या शेजारी अनेक घंटा ठराविक पदधतीने लावून एक भिंत तयार केली होती. असंख्य माणसे गर्दीतून हातात नकाशा घेऊन फिरत होती. माणसांबरोबर आलेली कुत्री गर्दीमुळे घाबरून गेलेली दिसत होती. बागेच्या मागच्या बाजूला Tulip ची शेती केली होती. या शेतातून बोटीची फेरी होती पण गर्दीमुळे 3-4 तास थांबावे लागणार होते त्यामुळे आम्ही तो कार्यक्रम रद्द केला. पण शेतामध्ये असलेल्या जांभळ्या, गुलाबी, लाल रांगा बघायला मिळाल्या.
Netherlands म्हणलं की त्यापाठोपाठ Tulip हे नाव येतंच! पण Tulip चा शोध Netherlands मध्ये नाही लागला हे सांगितल्यावर खोटे वाटेल नाही का? Tulip चा शोध Central Asia मधील Tien Shan mountain मध्ये लागला. युरोपमध्ये ही फुले कशी आली याबद्दल बऱ्याच कथा प्रचलित आहेत. ही फुले Netherlands मध्ये आली व इथलीच झाली. तेव्हापासून चालत आलेले संशोधन, प्रयोग यामुळे आज इथल्या बऱ्याच बागांमध्ये आपल्याला फुलांचे असंख्य प्रकार बघायला मिळतात.
Tulip शिवाय Hyacinths, Lilies, Daffodils, Roses, Orchids अशी इतर अनेक फुले सुंदर स्वरूपात सजवलेली इथे बघायला मिळाली. बऱ्याच ठिकाणी फुलांचे प्रदर्शन होते. त्यात फुलांचे वेगवेगळ्या पद्धतीने केलेले decoration बघून संपूर्ण हॉलमध्ये जणू काही फुलांची उधळण झाली आहे असेच भासत होते. आत-बाहेर सर्व ठिकाणी फुलेच फुले! या परिसरातील तलाव, तलावाकाठची झाडे, झाडांचे पाण्यात पडलेले प्रतिबिंब हे देखील सर्वांच्या फोटोतून सुटत नव्हते. जो बघू तो माणूस फोटो काढण्यात गुंतला होता. ते बघून मला एक जाणवले की, आहे तो क्षण पकडून ठेवायच्या नादात आपण बरेचदा प्रत्यक्ष बघण्याचा आनंद घ्यायचाच विसरतो. आणि पुढे किती वर्षे आपण हे फोटो बघतो? हा विचार आल्यावर आम्ही कॅमेरा, मोबाईल आत मध्ये ठेवून दिला.
रात्री परत हॉटेल मध्ये आल्यावर एक मोठा प्रश्न आमच्या समोर होता तो म्हणजे, उद्या (तिसऱ्या दिवशी) काय बघायचे? Amsterdam मधलेच एखादे ठिकाण बघायचे की Brussels ला जायचे? बस नी Brussels ला जायला 2.30 तास लागणार होते. दोन दिवस तसे खूप फिरल्यामुळे थोडे दमायला झाले होते, पण Brussel ला जावेसे पण वाटत होते. खुप विचार करून शेवटी आम्ही बसचे तिकीट काढलेच!
क्रमशः
Brussel विषयी वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
Brussels – आठवणींचा खजिना (athavaninchakhajina.com)
सौ. अनुराधा अमरेंद्र उकिडवे.
5.5.2023
7 responses to “Keukenhof”
छान वर्णन अनु
धन्यवाद
छान वर्णन केले आहेस.
धन्यवाद
लेख व ट्युलिप फुलाचा इतिहास छान लिहीले आहेस. फोटो पाहून 4-5 वर्षा पूर्वी आम्ही केलेल्या कुकेनहाॅफ ट्रिपची आठवण झाली. खूपच सुंदर बाग आहे. आता श्रीनगर येथे पण सुंदर ट्युलिप बाग आहे व ज्यांना कुकेनहाॅफला जायला जमणार नाही ते भारतातच या फुलांचा आनंद घेऊ शकतात.
[…] Schans – आठवणींचा खजिना (athavaninchakhajina.com)Keukenhof – आठवणींचा खजिना (athavaninchakhajina.com)Brussels – आठवणींचा खजिना […]
[…] Keukenhof – आठवणींचा खजिना (athavaninchakhajina.com) […]