Easter ची सुट्टी आणि Amsterdam

यावर्षी ईस्टर च्या सुट्टी मध्ये Amsterdam ला जायचे असा आमचा बेत होता. Tulip ची फुले आत्ता बघायला मिळतात त्यामुळे मला तिथे जाण्याची उत्सुकता होती. पण नेमके त्याच सुमारास माझे Residence permit card नवीन करायची वेळ आली. त्यामुळे जर नवीन कार्ड आले तरच आम्हाला जाता येणार होते. तसे नाही झाले तर मग नॉर्वे मध्ये कुठेतरी फिरूया असे आम्ही ठरवले. ईस्टर आठवड्यावर येऊन ठेपला तरी माझ्या कार्ड बद्दल काही समजत नव्हते. आता काही Amsterdam चे जमत नाही असे आम्ही ठरवले आणि एक दिवस मला कार्ड घ्यायला या असा mail आला. त्याच दिवशी आम्ही विमानाचे तिकीट काढले. आता हॉटेल शोधण्यात आमची परीक्षा होती कारण इतक्या ऐनवेळी हॉटेल पण पटकन मिळत नव्हते. खुप वेळ शोधल्याने एकदाचे चांगले हॉटेल मिळाले. सगळे महत्त्वाचे टप्पे पार करत एकदाचे आम्ही Amsterdam ला निघालो.

विमानाच्या खिडकीवर पडणारे Snowflakes
विमानाच्या खिडकीवर पडणारे Snowflakes


बस मधून विमानतळावर जाण्यासाठी आम्ही निघालो. थोडीफार असलेली गर्दी बघून मला जरा बरे वाटले कारण ईस्टर च्या एक आठवडा आधीपासूनच हळूहळू सर्वांची सुट्टीवर जाण्यास सुरुवात झाली होती. इथे बऱ्यापैकी सर्वांचे दुसरे घर कुठेतरी लांब म्हणजे गावाबाहेर किंवा जंगलामध्ये असते त्याला इथे “केबिन” म्हणतात. केबिनमध्ये कुटुंबाबरोबर आरामात राहून sking, trecking किंवा walking करणे इथल्या लोकांना आवडते. तर असे मागच्या आठवड्यापासूनच ईस्टरचे वारे वाहू लागल्याने सर्व रस्ते रिकामे दिसत होते. आत्ता आमच्यासारख्याच उरलेल्या लोकांची गर्दी झाली होती.
संध्याकाळी आमचे विमान निघाले. सकाळपासून बर्फ होताच! सर्वत्र ढग दाटले होते. विमान ढगांमधून जाताना अचानक सगळीकडे दिवे लावावे तसा लख्ख प्रकाश पडला. संध्याकाळी सव्वासात नंतर सूर्य देवानी दर्शन दिले. सगळीकडे सोनेरी कडा पसरल्याने ढग चमकू लागले. ढगांमधून सूर्य देवाबरोबर लपंडाव खेळत आम्ही Amsterdam Airport वर पोहोचलो. हे विमानतळ मला जरा जास्तच मोठे वाटले आणि याचे वेगळेपण म्हणजे इथे runway च्या खालून सुद्धा रस्ते जात होते हे असे मी पहिल्यांदाच पाहिले. आमचे हॉटेल हे विमानतळापासून साधारणपणे तासाच्या अंतरावर होते. रात्री 11 नंतर आम्ही हॉटेलमध्ये पोहोचलो. Amsterdam मध्ये बघण्यासाठी खूप आहे त्यामुळे दुसऱ्यादिवशी पासून खूप ठिकाणे बघायची असे ठरवून आम्ही आलो होतो. पण आता आमची चालण्याची क्षमता व आमचा उत्साह यावर सगळे अवलंबून होते. या विचारातच आम्ही झोपलो.

खूप दिवसांनी झालेले सूर्यादेवांचे दर्शन


सकाळी उठल्यावर खिडकीतून बाहेर बघितले तर अजून अंधारच होता. Amsterdam हळूहळू जागे होत होते. वाहनांचे, लोकांचे, जवळच असलेल्या स्टेशन मधील रेल्वे चे आवाज ऐकू येऊ लागले होते. आजूबाजूच्या परिसरात असलेल्या पवनचक्क्या अंधुकपणे दिसत होत्या. लवकर आवरून आम्ही निघालो. आमचे पहिले ठिकाण होते Zaanse Schans!

क्रमशः

(या पुढील लेख वाचण्यासाठी खाली लिंक दिली आहे.)

Zaanse Schans – आठवणींचा खजिना (athavaninchakhajina.com)

एमस्टरडॅम मध्ये मुख्य रेल्वे स्थानकासमोर दिसणारे चर्च

सौ. अनुराधा अमरेन्द्र उकिडवे.
17.4.2023

4 responses to “Easter ची सुट्टी आणि Amsterdam”

लेख कसा वाटला? आपल्या प्रतिक्रिया खालील Comment Box मध्ये नक्की लिहा…

माझ्या विषयी थोडेसे…

नमस्कार, मी सौ.अनुराधा अमरेन्द्र उकिडवे. मी एक गृहिणी आहे. मार्च 2022 मध्ये मी नॉर्वे मध्ये आले. मुळातच मला फिरायची खूप आवड आहे. त्यामुळे इथे आल्यावर लगेचच आम्ही फिरणे चालू केले. मग मला असे जाणवले की नॉर्वे बद्दल भारतात बऱ्याच लोकांना (खास करून माझ्या ओळखीमध्ये) माहीत नाहीये. त्यामुळे मी माझे सर्व अनुभव असलेले लेख लिहायला सुरवात केली. ते सर्व लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावे आणि जो आनंद मला लिहताना मिळतोय तसाच आनंद वाचकांना लेख वाचताना मिळावा याच हेतूने मी माझा ब्लॉग सुरू करत आहे.

Loading

Contact Info



वाचकांच्या प्रतिक्रिया


Social Links