• सर्वश्रेष्ठ गुरू

    सर्वश्रेष्ठ गुरू

    चालताना पूर्ण वेळ नजर इथल्या निसर्गावरून हटतच नव्हती. काही ठिकाणी दाट तर काही ठिकाणी विरळ होत जाणारी उंचच्या उंच झाडे बघत असताना “कितीही उंच गेलात तरी पाळेमुळे कायम जमिनीवरच ठेवा” ही शिकवण जणू निसर्ग आपल्याला देत आहे अशी जाणीव होते.

    Know More

  • Zaanse Schans

    Zaanse Schans

    पूर्वीच्या काळातील हस्तकला, इतिहास, संस्कृती ह्याचे आजच्या काळात केलेले उत्तम सादरीकरण बघणे म्हणजे जणू सर्वांसाठी एक पर्वणीच आहे! अर्थात ज्याच्या नावातच “शान” आहे असेच हे शानदार गाव आहे. हे सर्व मनात साठवून आम्ही तिथून निघालो.

    Know More

  • दुसरी बाजू

    दुसरी बाजू

    आता आमच्यासमोर नवीन आव्हान आहे ते म्हणजे इथल्या थंडीमध्ये राहणे. कारण आम्ही नॉर्वेला येणार हे ऐकूनच बऱ्याच जणांनी आम्हाला सांगितले “नॉर्वेला जात आहात, किमान एक वर्ष तरी राहून दाखवा.” पण हे सर्व स्वीकारताना व मार्ग काढत आनंदाने जगताना एक वेगळीच ऊर्जा आल्यासारखी वाटते आणि खूप छान वाटते.

    Know More

  • घट्ट नाते…

    घट्ट नाते…

    लहानपणापासूनच आपले व मातीचे नाते किती घट्ट असते नाही का? लहानपणी खेळात मातीचे आकार बनवताना, दिवाळीतील किल्ला करताना किंवा गणपतीची मूर्ती बनवताना देखील आपला व मातीचा संबंध येतो. पावसाळ्यात येणाऱ्या मातीच्या वासाने मन आनंदित होते. ही मुळे घट्ट रुजलेली असतात याचा प्रत्यय मी आज घेतला.

    Know More

  • निसर्गाची विविध रूपे

    निसर्गाची विविध रूपे

    सर्वत्र पसरलेला बर्फ त्यामुळे एखाद्या “Frozen world” मध्ये असल्याचा भास होतो. कधी सकाळी सकाळी उन्हाचे कवडसे पडून अगदी वेगळेच दृश्य दिसते तर कधी धुक्याची चादर सर्वत्र पसरते तेव्हा एखाद्या जादुई दुनियेत प्रवेश करत आहे का काय असा भास होतो. झाडांवर साठलेल्या बर्फामुळे झाडाला जणू काही बर्फाची फुलेच आली आहेत असे देखील भासते.

    Know More