मागे मी एका लेखात लिहले होते की जणू काही नॉर्वेची निसर्गदेवता मला सांगत आहे “ही तर फक्त सुरुवात आहे अजूनही खूप सृष्टी सौंदर्य बघायचे बाकी आहे.” खरंच त्या वाक्याची जणू काही रोजच आम्हाला प्रचिती होते. कारण निसर्गातील रोज होणाऱ्या बदलांमुळे आम्हाला रोज नवीन निसर्ग सौदर्य अनुभवायला मिळत आहे.
सर्वत्र पसरलेला बर्फ त्यामुळे एखाद्या “Frozen world” मध्ये असल्याचा भास होतो. कधी सकाळी सकाळी उन्हाचे कवडसे पडून अगदी वेगळेच दृश्य दिसते तर कधी धुक्याची चादर सर्वत्र पसरते तेव्हा एखाद्या जादुई दुनियेत प्रवेश करत आहे का काय असा भास होतो. झाडांवर साठलेल्या बर्फामुळे झाडाला जणू काही बर्फाची फुलेच आली आहेत असे देखील भासते.
आता परत मधून मधून छान ऊन पडायला सुरुवात होत आहे. आलेली मरगळ जाऊन परत उत्साही वाटायला लागलेले आहे व मनात एक प्रकारचा आनंद देखील होत आहे. कारण नॉर्वे मध्ये आल्यावर अनुभवलेला पहिला हिवाळा आता हळूहळू संपत आला आहे.
सौ. अनुराधा अमरेंद्र उकिडवे.
09.03.2023