-
निसर्गाची विविध रूपे
सर्वत्र पसरलेला बर्फ त्यामुळे एखाद्या “Frozen world” मध्ये असल्याचा भास होतो. कधी सकाळी सकाळी उन्हाचे कवडसे पडून अगदी वेगळेच दृश्य दिसते तर कधी धुक्याची चादर सर्वत्र पसरते तेव्हा एखाद्या जादुई दुनियेत प्रवेश करत आहे का काय असा भास होतो. झाडांवर साठलेल्या बर्फामुळे झाडाला जणू काही बर्फाची फुलेच आली आहेत असे देखील भासते.
-
असाही एक अनुभव…
हे सर्व बघून मला एक गोष्ट जाणवली ती म्हणजे, कितीही थंड हवामान, कितीही टोकाची परिस्थिती असली तरी त्या परिस्थितीमध्ये राहून, त्या परिस्थितीशी मिळते जुळते घेऊन आनंदी राहणे आणि इतरांना आनंदी ठेवण्यात मदत करणे हा इथल्या लोकांचा स्वभाव खूप काही शिकवून जातो.
-
निसर्गरम्य “जोर”
रोजच्या धावपळीपासून थोडा उसंत घेऊन कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी, निसर्गरम्य वातावरण अनुभवण्यासाठी व शांततेसाठी हल्ली प्रत्येक जण काही ना काही जागा शोधत असतो. या सर्वांसाठी हे फार्म हाऊस उत्तम पर्याय आहे.