आजचा विषय हा थोडासा वेगळा आणि गमतीदार आहे. पूर्वी ऑस्लो सिटी हॉलमध्ये असलेली १.४ टन वजनाची घंटा काढून टाकण्यात आली होती, कारण तिचा नाद इतर ४८ घंटांशी जुळत नव्हता. म्हणून ती घंटा धुळ खात पडली होती. हे पाहून आर्टिस्ट A.K.Dolven यांनी नंतर ती परत tune केली आणि ऑस्लो सिटी हॉलच्या बाहेर बसवली. तिथे cry baby pedal बसवले. पॅडल वर पाय दिला की ही घंटा वाजते. हा अशा प्रकारचा उपक्रम आणखीनही बऱ्याच ठिकाणी केला गेला आहे.
ही कल्पना मला खूप आवडली की धूळ खात पडलेल्या घंटेचा असा सुंदर वापर केला जाऊ शकतो. आज त्या ठिकाणी फिरायला आलेल्या प्रत्येक व्यक्तीचे लक्ष ही घंटा वेधून घेते. आणि मजा म्हणजे घंटा आहे तिथे खाली लगेच पॅडल नाहीये. थोडेसे कडेला आहे. त्यामुळे नवीन आलेल्यांना प्रश्न पडतो की ती घंटा मधूनच कशी काय वाजते. पण एकदा ते पॅडल दिसले आणि कळले की हे दाबल्यावर घंटा वाजते, मग कोणालाही ती घंटा वाजवण्याचा मोह आवरत नाही.
एका बाजूला समुद्र, दुसऱ्या बाजूला सिटी हॉलची भव्य इमारत व कडेला असलेला किल्ला या सर्वांच्या मध्ये असलेली ही घंटा आज लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना एक वेगळाच आनंद देऊन जाते.
11.8.2022














