जगातील सर्वोत्कृष्ट स्की – फेस्टिवल

“Norwegians are born with Skis on their feet” असे म्हणले जाते. Norway व Ski हे खूप पूर्वीपासूनचे समीकरण आहे असे म्हणता येईल. Ski हा शब्द old norse skíð वरून आला आहे त्याचा अर्थ “लाकडाची काठी” असा आहे. Norse पौराणिक कथांमध्ये सुद्धा Ski वरून केलेल्या शिकारीचा, युद्धाचा उल्लेख आहे.

Ski race करताना स्पर्धक.

1843 मध्ये पहिली Ski स्पर्धा ही Tromso मध्ये झाली. 1924 मध्ये पहिली Winter Olympic जी फ्रान्समध्ये झाली त्यामध्ये 4 Gold medals हे नॉर्वेला मिळाले.

1800 च्या अखेरीस दरवर्षी थंडीमध्ये नॉर्वे मधील लोकं Ski करण्यासाठीHolmenkollen येथे एकत्र येऊ लागले. 1892 मध्ये या ठिकाणी सगळ्यात पहिली Ski race झाली त्याला 12000 प्रेक्षक उपस्थित होते. 1952 मध्ये झालेल्या Olympic स्पर्धेसाठी 1,20,000 ते 1,50,000 प्रेक्षक उपस्थित होते. उपस्थित राहिलेल्या प्रेक्षकांचा हा विश्व विक्रम आजही कायम आहे. सुरवातीला महिलांना स्पर्धेमध्ये प्रवेश नव्हता. 1974 मध्ये सर्वात पहिल्यांदा अनिता (हे नाव नॉर्वेजियन लोकांमध्ये पण खूप आहे) नावाच्या Norwegian महिलेने स्पर्धेमध्ये भाग घेतला. आज हे Holmenkollen इतके प्रसिद्ध आहे की जागतिक पातळीवर असलेल्या स्पर्धांच्या केंद्रांपैकी हे एक केंद्र आहे.

Ski jump structure वर अशी अक्षरे तयार केली होती

सुरुवातीला या बद्दल थोडीफार माहिती वाचूनच इथे जाण्याची खूप उत्सुकता होती. मागच्या आठवड्यात येथे झालेले Ski Festival बघायला आम्ही गेलो. Holmenkollen हे ठिकाण डोंगरावर आहे. मेट्रो मधून जाताना खाली धुक्यात हरवलेले रस्ते, बर्फाने झाकले गेलेले fiords दिसू लागले. तिथल्या जवळच्या station वर आम्ही पोहचलो. तिथून काही अंतर चालून स्पर्धा असलेल्या ठिकाणी आम्ही निघालो.

सुरवातीला आम्ही skiing race बघायला गेलो. आम्ही Ski track च्या कडेला उभे राहून स्पर्धा बघू लागलो. सर्वजण तिथे थांबून स्पर्धकांना प्रोत्साहन देत होते. या स्पर्धेत सहभागी होऊन ती स्पर्धा पूर्ण करणे हे किती चिकाटीचे आणि अवघड आहे हे सर्वांना माहीत आहे, त्यामुळे अगदी शेवटी असलेल्या स्पर्धकाला सुद्धा सर्वजण आनंदाने प्रोत्साहन देत होते.

त्यानंतर आम्ही दुसऱ्या ठिकाणी Ski Jump बघण्यासाठी गेलो. दुपारी अडीच वाजता ही स्पर्धा चालू झाली. आजूबाजूला लांबवर पसरलेला सुंदर निसर्ग, लांब डोंगरावर असलेली कलात्मक घरे या सर्वांच्या मध्ये असलेले हे स्पर्धेचे ठिकाण आणि त्याची भव्यदिव्यता! ही अशी एखादी जागतिक स्तरावरची स्पर्धा प्रत्यक्ष बघण्याचा आमचा हा पहिलाच अनुभव. जर्मनी, इटली, जपान यासह अनेक देशातील स्पर्धक येथे सहभागी झालेले होते.

Ski jump structure आणि बसण्याची व्यवस्था.

नंतर आम्ही आमचा मोर्चा खाण्याच्या स्टॉल्स कडे वळवला. मध्यभागी मस्त शेकोटी पेटवली होती व त्या बाजूंनी बरेच जण ऊब घेत खाण्याचा आस्वाद घेत होते. एके ठिकाणी संत्री एका टोपलीत ठेवली होती, तर दुसरीकडे Swiss fondue (एका प्रकारच्या चीझ मध्ये घोळवलेला लहान ब्रेड चा तुकडा) होते. थोडे पुढे गेल्यावर मस्त गरम गरम waffles विकत होते.

हे सर्व बघताना जवळ जवळ 4 वाजले. खरं तर तिथून पाय निघत नव्हता पण जास्त थंडी वाढायच्या आता घरी पोहचायचे म्हणून निघालो. जरी पूर्ण वेळ नाही थांबू शकलो तरी थोड्या वेळ का होईना आम्ही तिथे जाऊन जागतिक पातळीवरील स्पर्धा बघितली त्याचा आनंद जास्ती आहे. स्पर्धेशिवाय इथे अजूनही बघण्यासाठी गोष्टी आहेत. त्या अजून मला बघायच्या आहेतच! त्यामुळे या वर्षी उन्हाळ्यात परत एकदा इथे यायचे असे ठरवूनच आम्ही तिथून निघालो.

Ski jump च्या तयारीत असताना (मध्यभागी आडव्या फळीवर बसलेला) एक स्पर्धक आणि वरती दिसणारा नॉर्वे चा झेंडा.

सौ. अनुराधा अमरेंद्र उकिडवे.

15.3.2023

लेख कसा वाटला? आपल्या प्रतिक्रिया खालील Comment Box मध्ये नक्की लिहा…

माझ्या विषयी थोडेसे…

नमस्कार, मी सौ.अनुराधा अमरेन्द्र उकिडवे. मी एक गृहिणी आहे. मार्च 2022 मध्ये मी नॉर्वे मध्ये आले. मुळातच मला फिरायची खूप आवड आहे. त्यामुळे इथे आल्यावर लगेचच आम्ही फिरणे चालू केले. मग मला असे जाणवले की नॉर्वे बद्दल भारतात बऱ्याच लोकांना (खास करून माझ्या ओळखीमध्ये) माहीत नाहीये. त्यामुळे मी माझे सर्व अनुभव असलेले लेख लिहायला सुरवात केली. ते सर्व लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावे आणि जो आनंद मला लिहताना मिळतोय तसाच आनंद वाचकांना लेख वाचताना मिळावा याच हेतूने मी माझा ब्लॉग सुरू करत आहे.

Loading

Contact Info



वाचकांच्या प्रतिक्रिया


Social Links