-
Vigeland park
घरातून निघतानाच नेमका पाऊस जोरात आल्यामुळे नक्की बाहेर जायचे का नाही अशी द्विधा मनस्थिती झाली खरी, पण तरी सुद्धा निश्चयाने Vigeland Park मध्ये जाण्यासाठी ट्राम मध्ये बसलेच. जोरात पाऊस आल्यामुळे रस्त्यावर लोकांची पळापळ चालू होती. काहीजण आपापले सामान सांभाळत आडोसा शोधताना दिसत होते. आमची ट्राम जेव्हा पार्क जवळ आली तेव्हा जवळ जवळ पाऊस थांबलाच होता…
-
उत्सुकता, प्रतीक्षा, कसोटी आणि…..(Tromsø भाग तीन)
आजही हे सर्व वर्णन आठवून लिहताना सर्व काही स्वप्नवत किंवा एखाद्या सुंदर गोष्टी मध्ये वाचल्यासारखे वाटत आहे. “अरे बापरे, Tromso ला खरंच जायचं?” तिथपासून सुरू झालेला हा सुंदर प्रवास आणि प्रवासातील सुंदर क्षण हे कधीही न विसरता येण्यासारखे आहेत.
-
Tromsø मधील संग्रहालये (भाग दोन)
जेव्हा आम्ही Polar Museum बघायला बाहेर पडलो तेव्हा खूप बर्फ पडत होता. बर्फाचे पुंजकेच्या पुंजके अंगावर येत होते! वारा इतका होता की छत्री घेऊन चालताना अगदी नाकी नऊ येत होते. तरीही जिद्दीने आम्ही त्या संग्रहालयामध्ये पोहोचलो.
-
Tromsø (भाग एक)
एक नक्की खात्री होती की हा प्रवास म्हणजे खूप मोठा टप्पा असणार आहे आणि हा टप्पा पूर्ण झाल्यावर जो आनंद मिळणार आहे तो खूप विलक्षण असणार आहे. त्यामुळे बाकी काही विचार न करता आम्ही निघालो.
-
नॉर्वे माझ्या नजरेतून…
नक्की आठवत नाही पण साधारणपणे पाच-सहा वर्षांपूर्वी ओळखीच्या एकांकडून नॉर्वे ची माहिती ऐकल्यावर तिथले वातावरण, तिथले हवामान याविषयी समजल्यावर थक्क होऊन आम्ही म्हणालो “बापरे नॉर्वे, कुठल्या कुठे आहे ते. कशी काय लोक राहत असतील तिकडे?” तेव्हा आम्हाला अजिबात कल्पनाही नव्हती की पुढे जाऊन आमच्याच आयुष्यामध्ये नॉर्वेला जाण्याची संधी येईल.
-
थंडी, वारा आणि थोडासाच बर्फ!
मला तर हा खूप छान योगायोग वाटला कारण आजपासूनच मी सकाळी जायला लागले. जर मी घरातच असते तर मला कदाचित समजले पण नसते की बाहेर बर्फ पडत आहे आणि मी या सुंदर क्षणाला मुकले असते.
-
रोज वेगळा अनुभव
खूपदा असे होते की, दिवसभर पाऊस झाला आणि संध्याकाळी पाच नंतर असे वाटते की आता संपला दिवस तर अचानक काही वेळासाठी का होईना सूर्य देव हजेरी लावून जातात.
-
17 मे Syttende Mai
आम्ही या वर्षी मार्च महिन्यात नॉर्वेमध्ये आलो. इथे आल्यापासून बऱ्याच स्थानिक व इतर लोकांकडून 17मे बद्दलची चर्चा ऐकत होतो. त्यामुळे आमच्या मनात खूप उत्सुकता निर्माण झाली व आम्ही पण या दिवसाची वाट पाहू लागलो. जसा जसा हा दिवस जवळ आला तसा इथल्या लोकांचा उत्साह वाढू लागला.
-
एका दुकानाची गोष्ट…
वरवर पाहता हे फक्त एक फर्निचर चे दुकान वाटले तरी दुकानात शिरल्यापासून प्रत्येक गोष्ट पाहताना अगदी हरखून जायला होते. छोट्या-छोट्या गोष्टी पासून अगदी पूर्ण घर बांधताना केलेली खोल्यांची रचना, त्यातील सर्व आकर्षक रीतीने मांडलेले सामान, त्यातील रंगसंगती हे बघताना अक्षरशः वेळेचा विसर पडतोच. आता सर्वांना समजले असेलच की मी कशाबद्दल बोलत आहे.
-
Flam – Bergen
काही प्रवास असे असतात की जे कायम आठवणीत राहतील. नॉर्वेतील एका सुंदर ठिकाणी जाण्याचा नुकताच योग आला. इथे आल्यापासून बऱ्याच जणांनी सुचवलेले व नॉर्वेत आल्यावर प्रत्येकानी एकदा तरी बघायलाच पाहिजे असे हे ठिकाण म्हणजे Flam!