Tromsø मधील संग्रहालये (भाग दोन)

जेव्हा आम्ही Polar Museum बघायला बाहेर पडलो तेव्हा खूप बर्फ पडत होता. बर्फाचे पुंजकेच्या पुंजके अंगावर येत होते! वारा इतका होता की छत्री घेऊन चालताना अगदी नाकी नऊ येत होते. तरीही जिद्दीने आम्ही त्या संग्रहालयामध्ये पोहोचलो.

Tromsø मध्ये बाकीच्या युरोपमधील शहरांप्रमाणे काही Museums आहेत, त्यातील Polar Museum हे Norwegian Arctic University च्या अंतर्गत येते. त्यामध्ये Tromsø शहर आणि Arctic राहणीमानाचा इतिहास दाखवला आहे. पूर्वीच्या काळी स्थानिक लोकांचे जीवन कसे होते, शिकार करण्याची पद्धत, तेथील घरांची रचना, कपडे, त्यांच्या वापरातील वस्तू, तसेच तिथे आढळणाऱ्या Polar bear, Seal आणि इतर निरनिराळ्या प्राणी आणि पक्ष्यांविषयी माहिती आम्हाला मिळाली. तिथे काही देखावे पण तयार केले होते जसे शिकारीसाठी बोटीतून प्रवास करतानाचे चित्रण, Polar bear, Seal अशा प्राण्यांना पकडण्यासाठी वापरले जाणारे सापळे.

नंतर आम्ही Polaria बघायला गेलो. हे एक मत्स्यालय आहे जिथे विविध मासे, त्यांची जीवनशैली अशी माहिती आम्हाला मिळाली. पूर्वी हे मत्स्यालय Oslo मध्ये होते जे 1995 साली Tromsø ला हलवले. या इमारतीची रचना पण वेगळी आहे म्हणजे जमिनीवरील बर्फाच्या तुकड्याप्रमाणे हे आपल्याला भासते. येथे लहान मोठे Aquriums आहेत ज्यात खूप प्रकारचे मासे आहेत.

चार सील (Seals) आहेत. त्यांना ठराविक वेळेला जेव्हा खायला देतात त्यावेळेला त्यांच्याकडून करून घेतले जाणारे निरनिराळे खेळ याचे प्रात्यक्षिक दाखवले जाते. इथे आणखीन एक वेगळा उपक्रम आहे तो म्हणजे सील स्पॉन्सर! ज्यात आपण दिलेल्या पैशातून या सील माशांसाठी खेळणी व इतर गोष्टी घेतल्या जातात.

एका Theatre मध्ये निरनिराळ्या विषयावरील Short films दाखवल्या जातात. आम्ही Northen Lights या विषयाची खूप सुंदर short film बघितली. त्याची फोटोग्राफी award winning photograher Ole.C.Salomonsen यांनी केली आहे व NASA ने घेतलेले फुटेज याच्यात दाखवले आहेत.

आपल्या प्रत्येक कृतीद्वारे निसर्गावरती होणारे परिणाम, निसर्ग आणि प्राणी यांचा परस्पर संबंध किंवा जमिनीवरील जीवसृष्टी व पाण्यातील जीवसृष्टी यांचे आयुष्य एकमेकांवरती कशा पद्धतीने अवलंबून आहे या सर्व गोष्टींचा विचार केला जावा यासाठी हे मत्स्यालय उभे केले आहे. Global Warming आणि त्याचे परिणाम हे सर्व दाखवणारी एक खोली इथे आहे. गेल्या 50 वर्षात आर्क्टिक प्रदेशातील बर्फाचे आच्छादन हे खूप कमी होत चालले आहे. त्याचा परिणाम हा फक्त उत्तरेकडील देशांनाच नाही तर पूर्ण पृथ्वीवर होत आहे. ही सर्व माहिती आपल्याला विचार करायला नक्कीच भाग पाडते. ह्याविषयी अजून माहिती खालील लिंक वर तुम्हाला मिळेल.

हे तर सर्व छान आम्ही बघितलेच पण Tromsø ला येण्याचे जे मुख्य कारण होते ते म्हणजे ध्रुवीय प्रकाश Northern Lights! त्याविषयी पुढच्या भागात..

Tromsø भाग 1- Tromsø (भाग एक) – आठवणींचा खजिना (athavaninchakhajina.com)

Tromsø भाग 3- उत्सुकता, प्रतीक्षा, कसोटी आणि…..(Tromsø भाग तीन) – आठवणींचा खजिना (athavaninchakhajina.com)

क्रमशः

सौ.अनुराधा अमरेंद्र उकिडवे

27.12.2022

One response to “Tromsø मधील संग्रहालये (भाग दोन)”

लेख कसा वाटला? आपल्या प्रतिक्रिया खालील Comment Box मध्ये नक्की लिहा…

माझ्या विषयी थोडेसे…

नमस्कार, मी सौ.अनुराधा अमरेन्द्र उकिडवे. मी एक गृहिणी आहे. मार्च 2022 मध्ये मी नॉर्वे मध्ये आले. मुळातच मला फिरायची खूप आवड आहे. त्यामुळे इथे आल्यावर लगेचच आम्ही फिरणे चालू केले. मग मला असे जाणवले की नॉर्वे बद्दल भारतात बऱ्याच लोकांना (खास करून माझ्या ओळखीमध्ये) माहीत नाहीये. त्यामुळे मी माझे सर्व अनुभव असलेले लेख लिहायला सुरवात केली. ते सर्व लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावे आणि जो आनंद मला लिहताना मिळतोय तसाच आनंद वाचकांना लेख वाचताना मिळावा याच हेतूने मी माझा ब्लॉग सुरू करत आहे.

Loading

Contact Info



वाचकांच्या प्रतिक्रिया


Social Links