Tromsø (भाग एक)

जेव्हापासून आम्ही Tromsø ला जायचे ठरवले तेव्हापासून खूप गोष्टींची उत्सुकता तर होतीच पण थोडी शंका पण होतीच की तिथे Oslo पेक्ष्या भरपूर थंडी असणार तर फिरता येईल का? दिवसभर पूर्ण अंधार असेल तर कसे राहणार? पण एक नक्की खात्री होती की हा प्रवास म्हणजे खूप मोठा टप्पा असणार आहे आणि हा टप्पा पूर्ण झाल्यावर जो आनंद मिळणार आहे तो खूप विलक्षण असणार आहे. त्यामुळे बाकी काही विचार न करता आम्ही निघालो.

Oslo पासून Tromsø ला विमानाने जायला साधारणपणे दोन तास लागतात. दोन्हीतील अंतर 1741 किलोमीटर आहे. निघाल्यावर काही वेळानी खाली बर्फाचे डोंगर, fjord, बर्फ पडून पांढरे झालेले जंगल हे आम्हाला दिसायला लागले. Tromsø च्या जवळ पोहचल्यावर चंद्र दर्शन झाले. आधी मला वाटले की Tromsø मध्ये उतरू तेव्हा खूप काळोख असणार पण थोडा उजेड बघूनच मला खूप बरे वाटले.

Tromsø हे Norway च्या उत्तरेकडे आहे. हे Arctic Circle मध्ये येते. Arctic Circle हे पृथ्वीवरील 5 महत्त्वाच्या Circle पैकी एक आहे. जे भाग ह्या वर्तुळात येतात त्या भागांमध्ये उत्तर गोलार्धातील वर्षातील सर्वात लहान दिवस जेव्हा polar night (24 तास रात्र), तसेच वर्षातील सर्वात मोठा दिवस तेव्हा midnight sun (24 तास दिवस) बघायला मिळतो.

तिथे पोहचल्यावर सर्व ठिकाणी खूप बर्फवृष्टी झालेली दिसली. बसमधून जाताना दिसणारे पांढरे डोंगर, चंद्र, पाणी, पाण्यात पडलेले चंद्राचे प्रतिबिंब ह्याचा आनंद आम्ही घेत होतो. सगळीकडे पांढरा रंग व त्यामुळे एक वेगळाच उजेड पसरलेला जाणवतं होता. वाटेत एक तलाव दिसला तो पूर्ण बर्फाने व्यापला होता. सुरवातीलाच हे सर्व बघितल्यावर हळू हळू अंदाज यायला लागला होता की पुढे अजून जी ठिकाणं बघणार आहोत ते नेहमीपेक्षा काहीतरी वेगळे असणार आहे.

Oslo आणि Tromsø ही दोन्ही ठिकाण Norway मध्येच आहेत पण तरी दोन्ही चे एक वेगळेच अस्तित्व आहे व दोन्ही आपापल्या जागी एक वेगळ्याच उंचीवर आहेत. खरं तर हे सर्व सृष्टीसौंदर्य बघून माझ्या मनात एकच विचार आला की हे सर्व शब्दापलिकडील व अवर्णनीय आहे. मी ह्याबद्दल काय आणि कसे लिहू. पण तरी एक प्रयत्न करून बघू म्हणून मी हे सर्व लिहीत आहे.

क्रमशः…

Tromsø भाग 2- Tromso मधील संग्रहालये (भाग दोन) – आठवणींचा खजिना (athavaninchakhajina.com)

Tromsø भाग 3- उत्सुकता, प्रतीक्षा, कसोटी आणि…..(Tromso भाग तीन) – आठवणींचा खजिना (athavaninchakhajina.com)

सौ. अनुराधा अमरेंद्र उकिडवे.

25.12.2022

2 responses to “Tromsø (भाग एक)”

लेख कसा वाटला? आपल्या प्रतिक्रिया खालील Comment Box मध्ये नक्की लिहा…

माझ्या विषयी थोडेसे…

नमस्कार, मी सौ.अनुराधा अमरेन्द्र उकिडवे. मी एक गृहिणी आहे. मार्च 2022 मध्ये मी नॉर्वे मध्ये आले. मुळातच मला फिरायची खूप आवड आहे. त्यामुळे इथे आल्यावर लगेचच आम्ही फिरणे चालू केले. मग मला असे जाणवले की नॉर्वे बद्दल भारतात बऱ्याच लोकांना (खास करून माझ्या ओळखीमध्ये) माहीत नाहीये. त्यामुळे मी माझे सर्व अनुभव असलेले लेख लिहायला सुरवात केली. ते सर्व लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावे आणि जो आनंद मला लिहताना मिळतोय तसाच आनंद वाचकांना लेख वाचताना मिळावा याच हेतूने मी माझा ब्लॉग सुरू करत आहे.

Loading

Contact Info



वाचकांच्या प्रतिक्रिया


Social Links