-
-
सहज मनातलं
कधीतरी अचानक जुने आवडते गाणे लागल्यावर एखादे ठिकाण, एखादी व्यक्ती किंवा एखादा पूर्ण दिवसच लगेच डोळ्यासमोर येतो. मन लगेच त्या आठवणींमध्ये बुडते. मग त्याबरोबर इतरही अनेक आठवणी एका मोगोमाग एक येऊन जातात. मग असे वाटते की परत ते क्षण जगायला मिळाले तर किती मज्जा येईल नाही?
-
भाषेपलीकडील आनंद
आमचे दोन तास कसे गेले ते आमचे आम्हालाच कळले नाही. असे म्हणतात ना की संगीताला भाषेची गरज नसते त्याचा प्रत्यक्ष अनुभव आम्ही काल घेतला.
-
कहाणी GTD नॉर्वे ची
हा उपक्रम नोर्वेमध्ये अगदी योग्य दिवसांमध्ये चालू झाला आहे असे मला वाटते कारण थंडी, अंधार या वातावरणात घरातच बसून राहावे लागते. आता सोबतीला “मराठी पुस्तके” पण आहेत त्यामुळे आता एकटेपणा वाटणार नाही.
-
जादुई दुनियेची सफर
एका बाजूला पूर्ण ऊन, दुसऱ्या बाजूला हळूहळू जमा होणारे ढग व त्यात डोकावणारा सूर्यप्रकाश आणि यातून जाणारी आमची ट्राम असा सुंदर अनुभव घेत आम्ही पुढे निघालो.
-
चंद्र दर्शन
आम्हाला नॉर्वे मधील चंद्रोदय बघायची खूप उत्सुकता होती. काल कोजागरी पौर्णिमेचा आदला दिवस होता आणि महत्त्वाचं म्हणजे आकाश पण निरभ्र होते. म्हणून आम्ही काल दिवसभर अशी जागा शोधत होतो की […]
-
“Deichman”
या जागेविषयी खूप जणांकडून ऐकले होते. खूप उत्सुकता होती म्हणून एकदा ठरवून आम्ही तिथे बघायला गेलो. ती इमारत बाहेरून पाहिल्यावरच आम्ही थक्क झालो, कारण ही इमारत जरा वेगळ्या आकाराची आणि इतकी सुंदर दिसत होती; त्यामुळे कधी एकदा आत मध्ये जाऊन बघते असे झाले.
-
नदीचा उत्सव
खरंतर काल दिवसभर हवा ढगाळ होती. दिवसभर ऊन नव्हते त्यामुळे जरा कंटाळवाणे झाले होते. पण हा उत्सव बघताना, नदी व आजूबाजूचा परिसर पाहत चालताना कंटाळा जाऊन मनात उत्साह कधी निर्माण झाला ते माझे मलाच कळले नाही.
-
Baerums Verk
Baerums Verk हे नॉर्वेमधील ऑस्लो जवळील एक गाव आहे. हे लोम्मा नदीच्या दोन्ही बाजूंनी वसलेले असून त्याची लोकसंख्या सुमारे ८००० आहे. हे वाईकेन काउंटी मधील बॅरुम नगरपालिकेतील एक ठिकाण आहे.