-

एका दुकानाची गोष्ट…
वरवर पाहता हे फक्त एक फर्निचर चे दुकान वाटले तरी दुकानात शिरल्यापासून प्रत्येक गोष्ट पाहताना अगदी हरखून जायला होते. छोट्या-छोट्या गोष्टी पासून अगदी पूर्ण घर बांधताना केलेली खोल्यांची रचना, त्यातील सर्व आकर्षक रीतीने मांडलेले सामान, त्यातील रंगसंगती हे बघताना अक्षरशः वेळेचा विसर पडतोच. आता सर्वांना समजले असेलच की मी कशाबद्दल बोलत आहे.
-

Flam – Bergen
काही प्रवास असे असतात की जे कायम आठवणीत राहतील. नॉर्वेतील एका सुंदर ठिकाणी जाण्याचा नुकताच योग आला. इथे आल्यापासून बऱ्याच जणांनी सुचवलेले व नॉर्वेत आल्यावर प्रत्येकानी एकदा तरी बघायलाच पाहिजे असे हे ठिकाण म्हणजे Flam!
-

Oslo Christmas Market
आज “बालदिन” आहे त्या निमित्ताने मला सांगावेसे वाटते या सर्व christmas market मध्ये फिरताना, दुकाने बघताना आम्हाला पण लहानपणी पाहिलेल्या cartoons मध्ये असलेल्या काल्पनिक गावांमधूनच आपण फिरत आहोत की काय असे वाटू लागले.
-

जादुई दुनियेची सफर
एका बाजूला पूर्ण ऊन, दुसऱ्या बाजूला हळूहळू जमा होणारे ढग व त्यात डोकावणारा सूर्यप्रकाश आणि यातून जाणारी आमची ट्राम असा सुंदर अनुभव घेत आम्ही पुढे निघालो.
-

चंद्र दर्शन
आम्हाला नॉर्वे मधील चंद्रोदय बघायची खूप उत्सुकता होती. काल कोजागरी पौर्णिमेचा आदला दिवस होता आणि महत्त्वाचं म्हणजे आकाश पण निरभ्र होते. म्हणून आम्ही काल दिवसभर अशी जागा शोधत होतो की
-

“Deichman”
या जागेविषयी खूप जणांकडून ऐकले होते. खूप उत्सुकता होती म्हणून एकदा ठरवून आम्ही तिथे बघायला गेलो. ती इमारत बाहेरून पाहिल्यावरच आम्ही थक्क झालो, कारण ही इमारत जरा वेगळ्या आकाराची आणि इतकी सुंदर दिसत होती; त्यामुळे कधी एकदा आत मध्ये जाऊन बघते असे झाले.
-

नदीचा उत्सव
खरंतर काल दिवसभर हवा ढगाळ होती. दिवसभर ऊन नव्हते त्यामुळे जरा कंटाळवाणे झाले होते. पण हा उत्सव बघताना, नदी व आजूबाजूचा परिसर पाहत चालताना कंटाळा जाऊन मनात उत्साह कधी निर्माण झाला ते माझे मलाच कळले नाही.
-

कहाणी एका घंटेची
एका बाजूला समुद्र, दुसऱ्या बाजूला सिटी हॉलची भव्य इमारत व कडेला असलेला किल्ला या सर्वांच्या मध्ये असलेली ही घंटा आज लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना एक वेगळाच आनंद देऊन जाते.
-

Baerums Verk
Baerums Verk हे नॉर्वेमधील ऑस्लो जवळील एक गाव आहे. हे लोम्मा नदीच्या दोन्ही बाजूंनी वसलेले असून त्याची लोकसंख्या सुमारे ८००० आहे. हे वाईकेन काउंटी मधील बॅरुम नगरपालिकेतील एक ठिकाण आहे.

