चंद्र दर्शन

आम्हाला नॉर्वे मधील चंद्रोदय बघायची खूप उत्सुकता होती. काल कोजागरी पौर्णिमेचा आदला दिवस होता आणि महत्त्वाचं म्हणजे आकाश पण निरभ्र होते. म्हणून आम्ही काल दिवसभर अशी जागा शोधत होतो की जिथून आम्हाला चंद्रोदय छान बघता येईल. सकाळी पण बाहेर जाऊन आलो होतो म्हणून परत संध्याकाळी एवढ्या थंडी मध्ये बाहेर जायचे का नाही असा विचार करत होतो. पण आम्हाला तो क्षण पण चुकवायचा नव्हता म्हणून अगदी शेवटच्या क्षणी आम्ही बाहेर जाण्याचा निर्णय घेतला.

आम्ही ठरवलं की बस नी एका ठिकाणी जाऊ आणि तिथे गेल्यावर जागा शोधू. पण आमची बस चुकली. पुढची बस अर्ध्या तासाने होती. त्यासाठी थांबलो असतो तर आमची चंद्रोदयाची वेळ चुकली असती म्हणून मग आम्ही ठरवले की मेट्रो ने थोडे अंतर जाऊ आणि तिथे गेल्यानंतर बघू की आम्हाला अशी जागा मिळते की नाही म्हणून मग आम्ही मेट्रोमध्ये बसलो. पण म्हणतात ना की जे होते ते चांगल्यासाठीच होते तसेच आमचे झाले कारण मेट्रो मधून थोडे अंतर पुढे गेल्यानंतर अनपेक्षित पणे आम्हाला अशी एक जागा दिसली की जिथे आम्हाला चंद्रोदय छान दिसेल म्हणून आम्ही लगेच मेट्रो मधून उतरलो. बरोबर वेळेच्या आधी आम्ही तिथे होतो त्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला होता.

हळूहळू डोंगराच्या पलीकडे पांढर्‍या रंगाची छटा दिसू लागली आणि काही सेकंदातच आम्हाला पूर्ण चंद्र दिसायला लागला. सध्या इथे Autumn असल्यामुळे नजर जाईल तिथे झाडाच्या विविध रंगछटा, आकाशात एका बाजूला संधिप्रकाश, लांब वर पसरलेली डोंगर रांग हे बघताना आम्हाला खूप आनंद होत होता. चंद्र बघून तर असे वाटत होते की डोंगरावर एक मोठा पांढरा गोळा ठेवला आहे.

काही तांत्रिक अडचणींमुळे आम्हाला नीट फोटो आणि व्हिडिओ काढता नाही आले त्यामुळे थोडी खंत वाटत होती. पण त्याच्यापेक्षा जास्ती आनंद दोन गोष्टींचा होता. एक म्हणजे आम्ही हे सगळं सौंदर्य प्रत्यक्ष पाहत होतो. आणि दुसरं म्हणजे माझा हा अनुभव तुमच्या बरोबर Share करता येणार होता.

तळटीप- कालच जाऊन बघून आलो म्हणून बरं झालं कारण आज (कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी) ढग आहेत त्यामुळे आम्हाला चंद्रोदय दिसलाच नसता.

09.10.2022

लेख कसा वाटला? आपल्या प्रतिक्रिया खालील Comment Box मध्ये नक्की लिहा…

माझ्या विषयी थोडेसे…

नमस्कार, मी सौ.अनुराधा अमरेन्द्र उकिडवे. मी एक गृहिणी आहे. मार्च 2022 मध्ये मी नॉर्वे मध्ये आले. मुळातच मला फिरायची खूप आवड आहे. त्यामुळे इथे आल्यावर लगेचच आम्ही फिरणे चालू केले. मग मला असे जाणवले की नॉर्वे बद्दल भारतात बऱ्याच लोकांना (खास करून माझ्या ओळखीमध्ये) माहीत नाहीये. त्यामुळे मी माझे सर्व अनुभव असलेले लेख लिहायला सुरवात केली. ते सर्व लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावे आणि जो आनंद मला लिहताना मिळतोय तसाच आनंद वाचकांना लेख वाचताना मिळावा याच हेतूने मी माझा ब्लॉग सुरू करत आहे.

Loading

Contact Info



वाचकांच्या प्रतिक्रिया


Social Links