- कलादालन (4)
- चित्रकला (4)
- पर्यटन माहिती (3)
- नॉर्वे (3)
- प्रवास वर्णने (42)
- क्रोएशिया (2)
- ग्रीस (1)
- जर्मनी (1)
- नेदरलँडस-बेल्जियम (5)
- नॉर्वे (29)
- भारत (1)
- स्वित्झर्लंड (4)
- माझ्याबद्दल थोडेसे (2)
- सहज मनातले (7)
प्रवास वर्णने…
एकदा का या सगळ्या गोष्टी व नशीब अशी एकत्र भट्टी जमून आली आणि प्रत्यक्ष डोळ्यांना Northern lights दिसले तर त्यावेळेस होणारा आनंद हा शब्दात सांगणे हे मात्र कठीणच जाते. कितीही वेळा बघितले तरी प्रत्येक वेळी बघताना होणारा आनंद हा काही वेगळाच असतो व अशी वेळ परत परत यावी आणि परत परत बघता यावे अशी इच्छा देखील मनात असतेच असते.
काही ठिकाणे अशी असतात की एकदाच काय पण कितीही वेळा पाहिली तरी प्रत्येक वेळी तितकीच सुंदर भासतात. अशा ठिकाणांचे वर्णन करणे जरा कठीण जाते. त्याबद्दल लिहिताना काय व कुठून सुरू करू हे समजत नाही. असाच एक देश आहे Croatia!!!
कितीही ऊन असो, थंडी असो किंवा बर्फ असो एवढ्या जिद्दीने, सातत्याने अनेक जण अनेक वर्ष पक्षी निरीक्षण करतात किंवा विशिष्ट पक्षाचे फोटो काढण्यासाठी तासानतास प्रतीक्षा करत, न थकता, न कंटाळता कसे बसतात याचे मला खूप कौतुक व अप्रूप वाटत आले आहेत. पण आज थोड्या वेळासाठी का होईना मी तो अनुभव प्रत्यक्ष घेतला आणि खरंच काहीतरी खूप छान, नवीन गोष्ट केल्याचा आनंद मला मिळाला.
आणखीन चालत अगदी वरच्या टप्प्यावर पोहोचलो तिथे एक पांढऱ्या भिंतीवर निळ्या रंगाचे डोम असलेले चर्च दिसले. इथले वैशिष्ट्य हेच की सर्व चर्चचे डोम निळ्या रंगाचे असते आणि पुढे एकावर एक असलेले मनोरे व त्यामध्ये घंटा बांधलेल्या असतात. चर्चचे डोम व आकाश यांचे रंग एकमेकात अगदी सुंदरतेने मिसळलेले दिसतात.
चालताना पूर्ण वेळ नजर इथल्या निसर्गावरून हटतच नव्हती. काही ठिकाणी दाट तर काही ठिकाणी विरळ होत जाणारी उंचच्या उंच झाडे बघत असताना “कितीही उंच गेलात तरी पाळेमुळे कायम जमिनीवरच ठेवा” ही शिकवण जणू निसर्ग आपल्याला देत आहे अशी जाणीव होते.
घरातून निघतानाच नेमका पाऊस जोरात आल्यामुळे नक्की बाहेर जायचे का नाही अशी द्विधा मनस्थिती झाली खरी, पण तरी सुद्धा निश्चयाने Vigeland Park मध्ये जाण्यासाठी ट्राम मध्ये बसलेच. जोरात पाऊस आल्यामुळे रस्त्यावर लोकांची पळापळ चालू होती. काहीजण आपापले सामान सांभाळत आडोसा शोधताना दिसत होते. आमची ट्राम जेव्हा पार्क जवळ आली तेव्हा जवळ जवळ पाऊस थांबलाच होता त्यामुळे मला जरा बरे वाटले.
सहज मनातलं…
दुसरी बाजू
आता आमच्यासमोर नवीन आव्हान आहे ते म्हणजे इथल्या थंडीमध्ये राहणे. कारण आम्ही नॉर्वेला येणार हे ऐकूनच बऱ्याच जणांनी आम्हाला सांगितले “नॉर्वेला जात आहात, किमान एक वर्ष तरी राहून दाखवा.” पण हे सर्व स्वीकारताना व मार्ग काढत आनंदाने जगताना एक वेगळीच ऊर्जा आल्यासारखी वाटते आणि खूप छान वाटते.
घट्ट नाते…
लहानपणापासूनच आपले व मातीचे नाते किती घट्ट असते नाही का? लहानपणी खेळात मातीचे आकार बनवताना, दिवाळीतील किल्ला करताना किंवा गणपतीची मूर्ती बनवताना देखील आपला व मातीचा संबंध येतो. पावसाळ्यात येणाऱ्या मातीच्या वासाने मन आनंदित होते. ही मुळे घट्ट रुजलेली असतात याचा प्रत्यय मी आज घेतला.
आंबा – फळ एक, आठवणी अनेक!!!
आंबा…सर्वांच्या अगदी आवडीचा आणि जिव्हाळ्याचा.
सहज मनातलं
कधीतरी अचानक जुने आवडते गाणे लागल्यावर एखादे ठिकाण, एखादी व्यक्ती किंवा एखादा पूर्ण दिवसच लगेच डोळ्यासमोर येतो. मन लगेच त्या आठवणींमध्ये बुडते. मग त्याबरोबर इतरही अनेक आठवणी एका मोगोमाग एक येऊन जातात. मग असे वाटते की परत ते क्षण जगायला मिळाले तर किती मज्जा येईल नाही?
भाषेपलीकडील आनंद
आमचे दोन तास कसे गेले ते आमचे आम्हालाच कळले नाही. असे म्हणतात ना की संगीताला भाषेची गरज नसते त्याचा प्रत्यक्ष अनुभव आम्ही काल घेतला.