-

Northern lights-एक जादुई अनुभव…
एकदा का या सगळ्या गोष्टी व नशीब अशी एकत्र भट्टी जमून आली आणि प्रत्यक्ष डोळ्यांना Northern lights दिसले तर त्यावेळेस होणारा आनंद हा शब्दात सांगणे हे मात्र कठीणच जाते. कितीही वेळा बघितले तरी प्रत्येक वेळी बघताना होणारा आनंद हा काही वेगळाच असतो व अशी वेळ परत परत यावी आणि परत परत बघता यावे अशी इच्छा…
-

अनुभव पक्षी निरीक्षणाचा…
कितीही ऊन असो, थंडी असो किंवा बर्फ असो एवढ्या जिद्दीने, सातत्याने अनेक जण अनेक वर्ष पक्षी निरीक्षण करतात किंवा विशिष्ट पक्षाचे फोटो काढण्यासाठी तासानतास प्रतीक्षा करत, न थकता, न कंटाळता कसे बसतात याचे मला खूप कौतुक व अप्रूप वाटत आले आहेत. पण आज थोड्या वेळासाठी का होईना मी तो अनुभव प्रत्यक्ष घेतला आणि खरंच काहीतरी…
-

सर्वश्रेष्ठ गुरू
चालताना पूर्ण वेळ नजर इथल्या निसर्गावरून हटतच नव्हती. काही ठिकाणी दाट तर काही ठिकाणी विरळ होत जाणारी उंचच्या उंच झाडे बघत असताना “कितीही उंच गेलात तरी पाळेमुळे कायम जमिनीवरच ठेवा” ही शिकवण जणू निसर्ग आपल्याला देत आहे अशी जाणीव होते.
-

Vigeland park
घरातून निघतानाच नेमका पाऊस जोरात आल्यामुळे नक्की बाहेर जायचे का नाही अशी द्विधा मनस्थिती झाली खरी, पण तरी सुद्धा निश्चयाने Vigeland Park मध्ये जाण्यासाठी ट्राम मध्ये बसलेच. जोरात पाऊस आल्यामुळे रस्त्यावर लोकांची पळापळ चालू होती. काहीजण आपापले सामान सांभाळत आडोसा शोधताना दिसत होते. आमची ट्राम जेव्हा पार्क जवळ आली तेव्हा जवळ जवळ पाऊस थांबलाच होता…
-

उत्सुकता, प्रतीक्षा, कसोटी आणि…..(Tromsø भाग तीन)
आजही हे सर्व वर्णन आठवून लिहताना सर्व काही स्वप्नवत किंवा एखाद्या सुंदर गोष्टी मध्ये वाचल्यासारखे वाटत आहे. “अरे बापरे, Tromso ला खरंच जायचं?” तिथपासून सुरू झालेला हा सुंदर प्रवास आणि प्रवासातील सुंदर क्षण हे कधीही न विसरता येण्यासारखे आहेत.
-

Tromsø मधील संग्रहालये (भाग दोन)
जेव्हा आम्ही Polar Museum बघायला बाहेर पडलो तेव्हा खूप बर्फ पडत होता. बर्फाचे पुंजकेच्या पुंजके अंगावर येत होते! वारा इतका होता की छत्री घेऊन चालताना अगदी नाकी नऊ येत होते. तरीही जिद्दीने आम्ही त्या संग्रहालयामध्ये पोहोचलो.
-

Tromsø (भाग एक)
एक नक्की खात्री होती की हा प्रवास म्हणजे खूप मोठा टप्पा असणार आहे आणि हा टप्पा पूर्ण झाल्यावर जो आनंद मिळणार आहे तो खूप विलक्षण असणार आहे. त्यामुळे बाकी काही विचार न करता आम्ही निघालो.
-

नॉर्वे माझ्या नजरेतून…
नक्की आठवत नाही पण साधारणपणे पाच-सहा वर्षांपूर्वी ओळखीच्या एकांकडून नॉर्वे ची माहिती ऐकल्यावर तिथले वातावरण, तिथले हवामान याविषयी समजल्यावर थक्क होऊन आम्ही म्हणालो “बापरे नॉर्वे, कुठल्या कुठे आहे ते. कशी काय लोक राहत असतील तिकडे?” तेव्हा आम्हाला अजिबात कल्पनाही नव्हती की पुढे जाऊन आमच्याच आयुष्यामध्ये नॉर्वेला जाण्याची संधी येईल.
-

थंडी, वारा आणि थोडासाच बर्फ!
मला तर हा खूप छान योगायोग वाटला कारण आजपासूनच मी सकाळी जायला लागले. जर मी घरातच असते तर मला कदाचित समजले पण नसते की बाहेर बर्फ पडत आहे आणि मी या सुंदर क्षणाला मुकले असते.
-

रोज वेगळा अनुभव
खूपदा असे होते की, दिवसभर पाऊस झाला आणि संध्याकाळी पाच नंतर असे वाटते की आता संपला दिवस तर अचानक काही वेळासाठी का होईना सूर्य देव हजेरी लावून जातात.
