थंडी, वारा आणि थोडासाच बर्फ!

हल्ली दुपारी साडेतीन-चार वाजता अंधार पडू लागला आहे. इतके दिवस छान ऊन पडून जी झाडे चमकत दिमाखात उभी असायचे त्याची जागा आता पाने पडून गेलेल्या झाडांनी घेतली आहे. मी चालायला जाते तो रस्ता, आजूबाजूचा परिसर, रस्त्यावर दिसणारी घरे हे रोजची सवयीची असली तरी या वातावरणात, थंडीत हे सर्व काही नवीन वाटायला लागले आहे. एवढ्या थंडीमध्ये, वाऱ्यामध्ये व अंधारामध्ये संध्याकाळी चालायला जायला नको वाटते त्यामुळे आज पासून मी सकाळी चालायला जायला लागले आहे.

आज सकाळी बाहेर गेले तेव्हा खूप वारा सुटला होता. तापमान खूप कमी होते. चालून परत घरी येताना अचानक काहीतरी बारीक पांढरे कण अंगावर पडत आहेत असे वाटले. काही सेकंदात अजून जास्ती प्रमाणात पांढरे कण पडायला लागले आणि माझ्या लक्षात आले की बर्फ पडायला लागला आहे. मी अनुभवलेला या वर्षीचा पहिला बर्फ! अगदी थोड्या प्रमाणामध्येच बर्फ पडत होता त्यामुळे फोटो किंवा व्हिडिओ काही घेता आले नाही. पण तो अनुभव खूप वेगळा होता.

मला तर हा खूप छान योगायोग वाटला कारण आजपासूनच मी सकाळी जायला लागले. जर मी घरातच असते तर मला कदाचित समजले पण नसते की बाहेर बर्फ पडत आहे आणि मी या सुंदर क्षणाला मुकले असते. अगदी काही वेळच हा बर्फ पडला व नंतर थांबला. मला तर खूप मस्त वाटत होते त्यामुळे थंडीमध्ये कुडकुडत का होईना पण काही वेळ घराबाहेरच उभे राहून मी त्या क्षणाचा आनंद घेत होते.

सौ. अनुराधा अमरेंद्र उकिडवे.

17.11.2022

1

लेख कसा वाटला? आपल्या प्रतिक्रिया खालील Comment Box मध्ये नक्की लिहा…

माझ्या विषयी थोडेसे…

नमस्कार, मी सौ.अनुराधा अमरेन्द्र उकिडवे. मी एक गृहिणी आहे. मार्च 2022 मध्ये मी नॉर्वे मध्ये आले. मुळातच मला फिरायची खूप आवड आहे. त्यामुळे इथे आल्यावर लगेचच आम्ही फिरणे चालू केले. मग मला असे जाणवले की नॉर्वे बद्दल भारतात बऱ्याच लोकांना (खास करून माझ्या ओळखीमध्ये) माहीत नाहीये. त्यामुळे मी माझे सर्व अनुभव असलेले लेख लिहायला सुरवात केली. ते सर्व लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावे आणि जो आनंद मला लिहताना मिळतोय तसाच आनंद वाचकांना लेख वाचताना मिळावा याच हेतूने मी माझा ब्लॉग सुरू करत आहे.

Loading

Contact Info



वाचकांच्या प्रतिक्रिया


Social Links