माझ्याबद्दल थोडेसे

नमस्कार, मी सौ.अनुराधा अमरेन्द्र उकिडवे. मी एक गृहिणी आहे. मार्च 2022 मध्ये मी नॉर्वे मध्ये आले. मुळातच मला फिरण्याची खूप आवड आहे त्यामुळे इथे आल्यावर आम्ही लगेच फिरणे चालू केले. इथली सर्व ठिकाणे बघताना माझ्या असे लक्षात आले की नॉर्वे बद्दल बऱ्याच भारतीय (खास करून माझ्या महितीतल्या) लोकांना माहीत नाहीये. म्हणून मी माझे अनुभव, माझी प्रवास वर्णने असलेले लेख लिहायला सुरवात केली. त्याआधी मी कोणत्याही प्रकारचे लिखाण केले नव्हते. पण जसे मी लिखणाची सुरवात केली तसे मला जाणवले की, प्रत्येक लेख लिहून झाल्यावर मला एक समाधान आणि आनंद मिळत आहे. त्यामुळे काहीही नवीन बघितले की कधी एकदा त्याविषयी लिहून काढू असे माझे झाले. मला लिहताना जसा आनंद मिळत आहे तसाच आनंद तुम्हाला माझे लेख वाचताना मिळावा याच हेतूने मी माझा ब्लॉग सुरू करत आहे. मला खात्री आहे तुम्हाला ही लेख नक्की आवडतील.

तशी मी पूर्वी पण बरीच फिरायचे पण आधीची मी आणि आत्ताची मी यात खूप बदल झाला आहे. वाचन जास्ती आवडू लागले. जास्त अभ्यासपूर्वक नजरेने फिरू लागले. आता असे वाटते की या आधीच का नाही सुचले लेख लिहण्याचे. कितीतरी ठिकाणे पहिली त्याबद्दल सुद्धा लिहले असते. पण असे म्हणतात ना, योग्य वेळ आल्यावरच प्रत्येक गोष्ट होते. अगदी तसेच माझे काहीसे झाले असेल कदाचित. आणि राहिलेल्या ठिकाणांचे म्हणायचे झाले तर संधी मिळाली की मी परत एकदा तिथे जाण्याचा आणि लिहण्याचा नक्की प्रयत्न करेन.

 

लेख कसा वाटला? आपल्या प्रतिक्रिया खालील Comment Box मध्ये नक्की लिहा…

माझ्या विषयी थोडेसे…

नमस्कार, मी सौ.अनुराधा अमरेन्द्र उकिडवे. मी एक गृहिणी आहे. मार्च 2022 मध्ये मी नॉर्वे मध्ये आले. मुळातच मला फिरायची खूप आवड आहे. त्यामुळे इथे आल्यावर लगेचच आम्ही फिरणे चालू केले. मग मला असे जाणवले की नॉर्वे बद्दल भारतात बऱ्याच लोकांना (खास करून माझ्या ओळखीमध्ये) माहीत नाहीये. त्यामुळे मी माझे सर्व अनुभव असलेले लेख लिहायला सुरवात केली. ते सर्व लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावे आणि जो आनंद मला लिहताना मिळतोय तसाच आनंद वाचकांना लेख वाचताना मिळावा याच हेतूने मी माझा ब्लॉग सुरू करत आहे.

Loading

Contact Info



वाचकांच्या प्रतिक्रिया


Social Links