स्वित्झर्लंड – खर्याअर्थी श्रीमंत देश(भाग दोन)

स्वित्झर्लंड -जमिनीवरील स्वर्ग (भाग एक) – आठवणींचा खजिना (athavaninchakhajina.com)

दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही बस मधून निघालो. म्हणजे तसा आणखी एक पर्याय होता की आपले आपण रेल्वेचा पास काढून फिरणे. पण आम्हाला बसचा पर्याय जास्ती आवडला कारण बस मध्ये गाईड असल्याने माहिती जास्ती मिळते आणि ग्रुप असल्याने थोड्याफार ओळखी पण होतात. बस निघाल्यावर लगेच आमच्या गाईडने माहिती द्यायला सुरुवात केली.

Zurich हे Switzerland मधील सर्वात मोठे शहर व व्यावसायिक केंद्र आहे. हे युरोपमधील सर्वात श्रीमंत शहर मानले जाते. येथील विमानतळ हे देशातील सर्वात मोठे व युरोपमधील महत्त्वाचे हवाई वाहतूक केंद्र आहे, तसेच Switzerland मधील सर्वात पहिले व मोठे रेल्वे स्टेशन हे पण इथेच आहे ते म्हणजे hauptbahnhof.

Limmat शिवाय Sihl ही देखील आणखी एक महत्त्वाची नदी आहे आणि ह्याचे वैशिष्ट्य म्हणजे ही नदी मुख्य स्टेशनच्या खालून वाहते हे ऐकल्यावर आम्हाला आश्चर्य वाटले कारण रेल्वे स्टेशन हे देखील underground आहे आणि ही नदी भुयारी मार्गामधून रेल्वे रुळाच्या वरून आणि खालून वाहते! बस निघाल्यापासून सर्वत्र इतक्या आकर्षक व ऐतिहासिक इमारती, तलाव, सुंदर रस्ते ह्याचे वर्णन व महत्त्व ऐकताना सतत जाणवत होते की हा देश इतका श्रीमंत व वैविध्यपूर्ण आहे की एकवेळ आपण याचे सौंदर्य बघायला कमी पडू पण हा देश कुठेच कमी पडणार नाही.

थोडे पुढे गेल्यावर आम्हाला Uetliberg दिसले. हा एक पर्वत आहे. आणि त्याच्यावरून संपूर्ण शहर आणि इथले तलाव याचे सुंदर दृश्य दिसते. नंतर आम्ही Lucerne मध्ये आलो. हे देखील एक सुंदर शहर आहे. शहराच्या मध्यभागी असलेला तलाव हा खूप सुंदर आणि असामान्य आहे कारण त्याचा आकार खूप अनियमित आहे. त्या तलावावरील Chapel Bridge ह्या तलावाचे सौंदर्य आणखीन वाढवतो. हा जुना लाकडी ब्रिज ओलांडून जाताना त्यामधील ऐतिहासिक चित्रे व फुलांची सजावट बघताना खूप छान व प्रसन्न वाटत होते.

नंतर आम्ही Lion Monument पाहिले. 1792 मध्ये फ्रेंच राज्यक्रांती दरम्यान क्रांतिकारकांनी पॅरिसमधील पॅलेस वर हल्ला केला आणि ज्या स्विस गार्डची हत्या केली त्याच्या स्मरणार्थ हे बनवले गेले आहे जे आता प्रसिद्ध स्मारकांपैकी एक आहे. या सर्व सुंदर स्थळांना भेट देऊन आम्ही पुढे निघालो. काही वेळानंतर आम्हाला आल्प्स पर्वतरांगा दिसू लागल्या. बऱ्याच लांब अंतरावर दिसत होत्या पण त्या दिवशी हवा छान होती त्यामुळे आम्हाला नीट बघता आल्या. प्रत्येकजण आपापल्या आवडीनुसार म्हणजे कोणी फोटो काढून, कोणी व्हिडिओ काढून तर कोणी नुसतं बघून ह्या क्षणाचा आनंद घेत होता.

दुसऱ्या महायुध्दाच्या वेळेस आल्प्स च्या डोंगररांगांनी दुर्गम असलेला प्रदेश काबिज करणे जर्मनी ला शक्य वाटले नाही त्यामुळे युध्दाच्या झळांपासून स्वित्झर्लंड वाचला आणि त्याच वेळेला त्यांनी त्यांचे बँकिंग क्षेत्र खूप समृद्ध केले. आणि देशाचे सौंदर्य पर्यटन व्यवसाय वाढीला पूरक ठरले.आणि हा देश खर्याअर्थी श्रीमंत झाला. आता आमचा पुढचा टप्पा होता “Mount Titlis”.

क्रमशः …

30.8.2022

स्वित्झर्लंड- Mount Titlis आणि Zurich (भाग 3) – आठवणींचा खजिना (athavaninchakhajina.com)

Alpine यात्रा – आठवणींचा खजिना (athavaninchakhajina.com)

One response to “स्वित्झर्लंड – खर्याअर्थी श्रीमंत देश(भाग दोन)”

लेख कसा वाटला? आपल्या प्रतिक्रिया खालील Comment Box मध्ये नक्की लिहा…

माझ्या विषयी थोडेसे…

नमस्कार, मी सौ.अनुराधा अमरेन्द्र उकिडवे. मी एक गृहिणी आहे. मार्च 2022 मध्ये मी नॉर्वे मध्ये आले. मुळातच मला फिरायची खूप आवड आहे. त्यामुळे इथे आल्यावर लगेचच आम्ही फिरणे चालू केले. मग मला असे जाणवले की नॉर्वे बद्दल भारतात बऱ्याच लोकांना (खास करून माझ्या ओळखीमध्ये) माहीत नाहीये. त्यामुळे मी माझे सर्व अनुभव असलेले लेख लिहायला सुरवात केली. ते सर्व लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावे आणि जो आनंद मला लिहताना मिळतोय तसाच आनंद वाचकांना लेख वाचताना मिळावा याच हेतूने मी माझा ब्लॉग सुरू करत आहे.

Loading

Contact Info



वाचकांच्या प्रतिक्रिया


Social Links